Pandharpur wari Palaki sohala Agrowon
ॲग्रो विशेष

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Palkhi Sohala: पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपानदेव आणि चांगदेव महाराज यांच्या पालख्या तोंडले-बोंडले नगरीत एकत्र आल्याने संपूर्ण परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघाला.

सुदर्शन सुतार

Solapur News: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या वाटेवर असलेले प्रमुख संतांचे पालखी सोहळे गुरुवारी (ता.३) एकाच वेळी तोंडले-बोंडले परिसरात दाखल झाले. त्यामुळे एकीकडे लाखो वैष्णवांचा मेळा आणि दुसरीकडे टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकारामांच्या अखंड जयघोषाने महामार्ग जणू भक्तिरसाने भारून गेला.

संत सोपानदेव व संत चांगावटेश्वर महाराज यांचे पालखी सोहळे बुधवारी मुक्कामासाठी, तर गुरुवारी जगद्गुरू तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळे दुपारच्या विसाव्यासाठी तोंडले-बोंडले नगरीत दाखल झाले.

सोहळ्यात होत असलेल्या भजन, कीर्तन व हरिनाम गजरात संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण न्हाऊन गेला. पालखी सोहळ्याच्या परंपरेनुसार येथे होणारे माउलींच्या सोहळ्याचे गोलरिंगण, तुकाराम महाराजांचा धावा, संत तुकाराम व संत सोपानदेव महाराज यांची संत भेट व संतांचे दर्शन यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारच्या विसाव्यानंतर हे सर्व सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले.

प्रारंभी, सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांचे स्वागत तोंडले-बोंडले ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. या वेळी सरपंच विजयसिंह माने देशमुख, भिकारी लोंढे, वेळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोसावी, उपसरपंच शरद चव्हाण, नितीन शिंदे, सदस्य धनाजी जाधव, महेंद्र लोंढे, ग्रामसेवक बी. बी. कोरबू यांनी केले. दरम्यान, एकापाठोपाठ निघालेले पालखी सोहळे पुढे भंडीशेगाव आणि पिराची कुरोली येथे विसावले.

वरुण राजाच्या साक्षीने रंगला संत भेट सोहळा

पालखी मार्गावर बोंडले येथे जगद्गुरू तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांच्या संत भेटीचा अनोखा सोहळा रंगला. यावेळी दोन्ही पालखी सोहळ्यातील पालखी प्रमुखांनी दोन्ही संतांच्या पालख्यांचे रथ जवळ घेत एकमेकांना श्रीफळ देऊन गळाभेट घेतली. या सोहळ्याची दृश्य पाहून जमलेल्या भाविकांना धन्य झालो असल्याच्या भावना झाल्या. त्याचवेळी वारकऱ्यांच्या ‘माउली माउलीं’ जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भेटीचा हा प्रसंग सुरू असतानाच वरुणराजानेही हलकी हजेरी लावल्याने आनंदात आणखीच भर पडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT