Paddy Production Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Production : शिराळा तालुक्यात भात उत्पादन ४० टक्के घटण्याची शक्यता

Paddy Farming : शिराळा तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. त्यातच उशिरा पावसाला सुरुवात झाली. या साऱ्याचा फटका भात पिकाला बसला आहे.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. त्यातच उशिरा पावसाला सुरुवात झाली. या साऱ्याचा फटका भात पिकाला बसला आहे. परिणामी भाताच्या उत्पादनात ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती आहे.

शिराळा तालुका भात लागवड आणि उत्पादनात अग्रेसर आहे. तालुक्यात धूळ वाफेवर भाताच्या पेरणीची सुरुवात होते. मेच्या अखेरीस तालुक्यात धूळवाफेच्या पेरण्या पूर्ण होतात. वास्तविक, मार्च-एप्रिलपासून अधून-मधून वळवाचा पाऊस पडतो. त्या पावसावर पेरणीपूर्व मशागती पूर्ण केल्या जातात. त्यानंतर पेरण्या करण्यास प्रारंभ होतो.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु यंदा वळवाच्या पावसाने दडी मारली. त्यामुळे भात पेरणीचे नियोजन विस्कळीत झाले. अशा परिस्थितीही शेतकऱ्यांनी धूळ वाफ पेरणी पूर्ण केली. परंतु एक ते सव्वा महिना शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा केली.

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर शेतात पाणी सोडून भाताची उगवण केली. अनेकांनी पाणी सोडून रोप लावणीची कामे केली. अन्य शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नव्हता.

जून कोरडा गेला. जुलैमध्ये पाऊस सुरू झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला. भात पिकास नवसंजीवनी मिळाली. पिकाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आता भात पीक जोमाने वाढेल, अशी आशा शेतकरी बाळगू लागला.

मात्र पिके ऐन फुलोऱ्यात आल्यावर पावसाने दडी मारली. त्याचा मोठा फटका बसला. भात ओंब्यांची वाढ झाली नाही. परिणामी, उत्पन्नात घट होणार आहे. पाणी देऊन ज्यांनी पीक घेतले, त्यांना १५ टक्के फटका बसण्याची शक्यता असून पावसावर अवलंबून शेतीत ४० टक्के घट होण्याची भीती आहे.

आकड्यांत स्थिती

भात क्षेत्र ११ हजार १७० हेक्टर

खरिपात तूट सुमारे ४० टक्के

बागायती क्षेत्रात तूट सुमारे १५ टक्के

पाऊस वेळेत न झाल्याने भाताच्या उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. तसा अहवाल आम्ही शासनाकडे पाठवला आहे.
- सुभाष घागरे, तालुका कृषी अधिकारी, शिराळा
भात पेरणी केल्यापासून पुरेसा पाऊस झाला नाही. त्यातच फुरोलावस्थेत असतानाच पावसाने दडी मारली. यामुळे उत्पादन कमी होणार आहे.
- सखाराम पाटील, भात उत्पादक शेतकरी, आरळा, ता. शिराळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT