Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : भात काढणीची कामे वेगात; मजुरांची मोठी टंचाई

Labor Shortage : मुळशी तालुक्यात भात काढणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र या कामांसाठी मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे.

Team Agrowon

Mulshi News : मुळशी तालुक्यात भात काढणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र या कामांसाठी मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे. काही भागांत मशिनने काढणीचे काम सुरू आहे.

तालुक्यात पावसाने उशिरा उघडीप दिली. त्यामुळे रखडलेल्या भात काढणीने आता वेग घेतला आहे. तालुक्यात शहरीकरण मोठे झाले आहे. तसेच पश्चिम भागातील तरुण मोठ्या प्रमाणावर शहरात स्थायिक झाला आहे.

त्यामुळे शेतात काम करण्यासाठी घरातील माणसे राहिली नाहीत. त्यातच आदिवासी शेतमजूर मिळत नाहीत. भात लावणीस कोकणातील शेतमजूर मिळतात तसे भात काढणीस मिळत नाहीत. त्यामुळे तालुक्यात शेतमजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे साठेसाई येथील शेतकरी संतोष साठे यांनी सांगितले.

दरम्यान, एकमेकाला मदत करत भात काढणी करण्यात येत आहे. तसेच तालुक्यात बाहेरील व्यावसायिकांच्या भात काढणी मशिन येत आहेत. एक तासाला निश्‍चित दराप्रमाणे भात काढणी करत आहेत.

मजूर टंचाईमुळे शेतकरी मशिनने काढणीस प्राधान्य देत आहेत. अनेक शेतकरी काढणी करून खळ्यात उडवी लावून ठेवतात. खरिपाची पेरणी उरकल्यावर भात झोडणी करतात. भात पिकावर करपा रोग गेल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होणार आहे. भात काढणीचा हंगाम किमान तीन आठवडे सुरू राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT