Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : रब्बीच्या तोंडावर भात काढणीला वेग

Rabi Season : रब्बी हंगामाच्या तोंडावर भात काढणीला वेग आला असून, काही ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने भात काढणी सुरू आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : रब्बी हंगामाच्या तोंडावर भात काढणीला वेग आला असून, काही ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने भात काढणी सुरू आहे. येत्या महिनाभरात सर्व काढणी पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे जिल्ह्याच्या भात पट्ट्यात सरासरीच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ५९ हजार ६७९ हेक्टर म्हणजेच १०० टक्के भाताच्या पुनर्लागवडी झाल्या होत्या.

वाढीच्या अवस्थेत असताना काही वेळा पावसाचा खंड पडल्याने भात पिके वाया जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना होती. परंतु अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे भात पिकांना काहीसा दिलासा मिळत होता. त्यामुळे बऱ्यापैकी भात पिकांची वाढ झाली. गेल्या महिन्यापासून भात काढणीला आली आहेत.

पुणे जिल्ह्यातील सात ते आठ तालुके भाताचे आगार म्हणून ओळखले जातात. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने भात पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामुळे आर्थिक प्रश्न उपस्थित राहिला होता.

या वर्षी रोपवाटिका टाकल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. परंतु उशिराने का होईना पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. उशिराने झालेल्या मुसळधार पावसामुळे भात उत्पादकांच्या पदरात भाताचे उत्पादन पडले आहे.

आदिवासी भागात शेतकरी कामात व्यग्र

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात तळेघर, पाटण, जांभोरी, पोखरी, शिवरामध्ये सध्या भात पीक काढणीला वेग आला असून, ‘डोंगरी शेत माझे’ या उक्तीप्रमाणे सर्वजण कामात व्यग्र असतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.

या ठिकाणचा आदिवासी बांधव भात पिकाबरोबर नाचणी, वरई, राळे, तसेच भात पिकांच्या वेगवेगळी पिके घेतो. यामध्ये तांबडा रायभोग, खडके, इंद्रायणी, आंबेमोहर, बासमती आदी प्रकार येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT