Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : डहाणूत भातपीक कापणीला वेग

Paddy Crop : यंदा परतीच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असले, तरी सध्या गरवे भातपीक चांगल्या स्थितीत आहे, असे शेतकरी सांगत आहेत.

Team Agrowon

Palghar News : डहाणू तालुक्यात भातकापणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी भातकापणीच्या कामात व्यग्र आहेत. यंदा परतीच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असले, तरी सध्या गरवे भातपीक चांगल्या स्थितीत आहे, असे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे कापणीला वेग आला आहे. मजुरांची कमतरता असल्याने कुटुंबीय एकत्र कापणी करत आहेत.

डहाणू व तलासरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती होते. येथील आदिवासी कुटुंबांचे जीवन याच शेतीवर अवलंबून आहे. पारंपरिक पद्धतीने कापणी करून पुढे भाजीपाला व कडधान्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मजुरांची मोठी समस्या जाणवत आहे.

कापणीसाठी मजूर कमी मिळत असल्याने घरातील सदस्य आणि सध्या दिवाळीच्या सुट्या लागल्याने शाळकरी मुलेही कापणीच्या कामात हातभार लावत आहेत. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनावरच आदिवासी शेतकऱ्यांचे कुटुंबीय उदरनिर्वाह करतात.

राज्य महामंडळाद्वारे दरवर्षी भाताची खरेदी किंमत मिळत असल्याने हे शेतकरी कुटुंबाचा पालन-पोषण व मुलांचे शिक्षण चालवतात. मात्र, परतीच्या पावसामुळे कापणीला उशीर झाला. त्यामुळे झोडणीही लांबणार आहे. त्यामुळे पावलीही विकू शकणार नाहीत. परिणामी, यंदाच्या दिवाळीला मंदीचे वातावरण असेल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

या वर्षी मॉन्सूनोत्तर पावसाने भातपिकाचे नुकसान केले आहे. मात्र, गरवे पीक सध्या चांगल्या स्थितीत असल्याने त्याच्या कापणीला सुरुवात झाली आहे.
- जयप्रकाश कोदे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT