Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : चांगल्या पावसामुळे भातशेती बहरली

Team Agrowon

Raigad News : जिल्ह्यात यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने तालुक्यातील भातशेती चांगली बहरली आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून होत असलेल्या अनियमित पावसामुळे येथील शेतकऱ्यांना भातपिकाचे उत्पादन घेणे जिकिरीचे बनले होते; परंतु या वर्षी खालापुरात भातशेतीसाठी आवश्यक तेवढा वरुणराजा बरसल्याने त्‍याचा लाभ पिकांना झाला आहे.

जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती लागवड केली जाते. त्‍यामुळे तालुक्‍याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. यावर्षी तालुक्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे.

त्‍यामुळे भातशेती बहरली असून बळीराजा समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील केळवली, वणी, बीड खुर्द, उंबरविरा, जांबरुंग, जांबरुंग ठाकूरवाडी, खरवई, घोडीवली, नावंढे, कलोते, नडोदे, निगडोली, चौक, आसरोटी, कोपरी, छत्तीशी विभाग अशा गावांसह तालुक्यातील अन्य ग्रामीण भागातील भातशेती डौलाने बहरली असल्याने बळीराजा सुखावला आहे.

यावर्षी शेतकऱ्यांनी कोलम, दप्तरी, रत्ना, जया, अवनी, वैष्णवी, कर्जत तीन व अन्य अत्याधुनिक विविध प्रकारच्या जातीच्या भातपिकांची लागवड केली गेली आहे. भातपिके बहरली असून भाताच्या लोंब्या फुलायला सुरुवात झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण

Farmer Incentive Scheme : कर्जमुक्ती प्रोत्‍साहन योजनेचा ४२४ शेतकऱ्यांना लाभ

Solar Pump Scheme : मागेल त्याला सौर कृषिपंपांचा ५० हजार शेतकऱ्यांना लाभ

Crop Insurance : विमा भरपाईपोटी २७.७३ कोटींचा लाभ

Latur Gramin Assembly : गेल्या निवडणुकीतील चूक आता नाही : लोणीकर

SCROLL FOR NEXT