Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : मूलमधील भात उत्पादकांना पीकविमा मिळण्याची प्रतीक्षा

Farmers Waiting for Crop Insurance : शेतकरी गेल्या वर्षीच्या पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Team Agrowon

Chandrapur News : नैसर्गिक आपत्तीत नुकसान होत असल्याने पीकविमा हा एक पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र पिकाचा विमा काढला तरी भरपाई वेळेत मिळतच नाही. असाच अनुभव भात उत्पादक शेतकऱ्यांना आला आहे. पात्र शेतकरी गेल्या वर्षीच्या पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. कापूस, सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रही बरेच आहे. मात्र बदलत्या हवामानाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस पडणे यासह अन्य कारणांमुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. पिकाच्या नुकसानीला रोखण्यासाठी पीकविमा उतरविण्याचे आवाहन शासनाने केले होते.

त्यानुसार तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडून विमा काढला. मात्र, तालुक्यातील नुकसानग्रस्त धान उत्पादकांना अद्याप पीकविमा मिळाला नाही. तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पीकविमा कपनीला पैसेही उपलब्ध झाले आहेत. आनंदाचा दिवाळी सण असताना शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता पात्र शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीने पीकविमा रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेळेवर पीकविमा कंपनीला नुकसानीबाबत कळविण्यात आले. एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेचा अर्ज करण्यात आला. पात्र शेतकरी यादीत माझे नाव आहे. परंतु पीकविमा कंपनीकडून अजूनही पीकविमा रक्कम मिळाली नाही.
अनिल वासेकर, शेतकरी, सिंतळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watershed Management: पाण्याबरोबर मातीचाही ताळेबंद महत्त्वाचा...

Agricultural Technology: कृषी तंत्रज्ञान विकासासाठी आंतरविद्याशाखीय गटकार्याची गरज

Paddy Cultivation: एरोबिक भात लागवड - कमी पाण्यात भात उत्पादनाचा पर्याय

Jackfruit Farming: संत्रा पट्ट्यात फणसाचा प्रयोग

Agriculture Crisis: शेतीला गरज सर्वंकष पुनर्रचनेची!

SCROLL FOR NEXT