Paddy Cultvation Agrowon
ॲग्रो विशेष

फदालेवाडी-उगलेवाडी येथे चारसूत्री पद्धतीने भात लागवड प्रशिक्षण

फदालेवाडी- उगलेवाडी (ता. आंबेगाव) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आंबेगाव, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चारसूत्री पद्धतीने भात लागवड शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते

टीम ॲग्रोवन

शिणोली, जि. पुणे ः फदालेवाडी- उगलेवाडी (ता. आंबेगाव) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आंबेगाव, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चारसूत्री पद्धतीने भात लागवड शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते

कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ राहुल घाडगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्याच्या पद्धतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ धनेश पडवळ यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले. तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी शेतकऱ्यांना चारसूत्री पद्धतीचा अवलंब करावा तसेच बीज प्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करावी, असे आवाहन केले.

या वेळी टी. एस. ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम फदाले, आंबेगाव तालुका देखरेख संघाचे संचालक भरत फदाले, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, सरपंच मीना बजरंग उगले, उपसरपंच शंकर शिंगाडे माजी जिल्हा, माजी परिषद सदस्य जनाबाई उगले, आरोग्य मंडळाचे काळेसाहेब भोर साहेब उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी प्रवीण मुंढे, कृषी पर्यवेक्षक व्ही. एम. तळपे, कृषी सहायक नागेश मोहरे, सहायक रोहन शेटे पी. बी उगले, अमोल खमसे, अनिता केदारी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे धोंडीभाऊ पाबळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT