Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना फटका

Rain Update : शहापूर तालुक्यात सध्या भात कापणी, झोडणी,मळणीचा हंगाम सुरू आहे. पावसामुळे शेतात पाणी साचले आहे, खळ्यातील भाताचे भारे भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : दिवाळीत मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले आहे. शहापूर तालुक्यात सध्या भात कापणी, झोडणी,मळणीचा हंगाम सुरू आहे. पावसामुळे शेतात पाणी साचले आहे, खळ्यातील भाताचे भारे भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असताना पावसाने दोन दिवसांपासून धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील हसू मावळले आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या भात कापणी, झोडणी व मळणीचा हंगाम सुरू आहे.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने भाताचे पीक उत्तम प्रकारे आले होते; मात्र दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने पिकाची नासाडी झाली.

शेतातले कापणीला आलेले गरवा प्रकाराचे उभे पिक आडवे झाले आहे. काही ठिकाणी कापलेले पीक पाण्यावर तरंगते आहे. खळ्यात माचलेल्या भाताचे भारे भिजले आहेत. झोडलेला पेंढा भिजून वाया गेला आहे.

काकडीचे नुकसान

भात विक्रीतून आलेल्या पैशातून दिवाळीसाठी कपडे खरेदी करणे, जिन्नस-सामानाची व फटाक्यांची व्यवस्था करायची असे नियोजन असते; मात्र पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काकडी, भेंडी लागवडीलाही याचा जोरदार फटका बसला आहे. शेतात साठलेल्या पाण्यात पिकाची रोपे आडवी पडली आहेत. दाण्याच्या लोंब्या गळून पडत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

Kolhapur Millet Festival: कोल्हापुरात मिलेट महोत्सवात ‘उत्पादक ते ग्राहक’ थेट विक्री

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

SCROLL FOR NEXT