Padalse Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Padalse Irrigation Project : पाडळसे सिंचन प्रकल्प दुर्लक्षित

Agriculture Irrigation : खानदेशात गिरणा धरणानंतर महत्त्वाचा ठरू शकणाऱ्या तापी नदीवरील पाडळसे (ता. अमळनेर) येथे रखडलेला निम्न तापी सिंचन प्रकल्प सुमारे २७ वर्षे दुर्लक्षित आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात गिरणा धरणानंतर महत्त्वाचा ठरू शकणाऱ्या तापी नदीवरील पाडळसे (ता. अमळनेर) येथे रखडलेला निम्न तापी सिंचन प्रकल्प सुमारे २७ वर्षे दुर्लक्षित आहे. तत्कालीन खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा केला, पण तो अपूर्णच राहिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, धरणगाव, जळगाव, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर भागासाठी हा प्रकल्प लाभदायी ठरू शकणार आहे. तापी नदीवर खानदेशात मध्यम व लघू प्रकल्प आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यात सध्या भुसावळनजीकचा हतनूर मध्यम प्रकल्प काहीसा दिलासादायक आहे. जळगाव व यावलच्या सीमेवर तापी नदीत शेळगाव बॅरेज अलीकडेच तयार झाले आहे. पण त्याद्वारे शेतीला पाणी पोहोचविले जात नाही.

तसेच त्यात १०० टक्के जलसाठाही करणे सध्या शक्य नाही. धुळ्यात सुलवाडे, नंदुरबारमध्ये प्रकाशा व सारंगखेडा हे बॅरेज आहेत. या बॅरेजमधूनही थेट शेतीपर्यंत पाणी दिले जात नाही. तापी नदीचे मोठे पाणी गुजरातेत वाहून जाते. गुजरातमध्येही फक्त उकाई हा प्रकल्प तापी नदीवर आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणास सुमारे ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यातही आता ५४ टक्के गाळ आहे. जळगाव जिल्ह्यात तापी नदीवर मोठ्या किंवा मध्यम प्रकल्पाची गरज असून, ही गरज पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प पूर्ण करू शकतो. या प्रकल्पाची किंमत सतत वाढली आहे. त्याचे काम हाती घेण्यात आले. पण ते पूर्ण झाले नाही. त्याला आता सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये निधीची गरज आहे. पुनर्वसन व अन्य मुद्देही आहेत. काही गावांचे पुनर्वसन झाले आहे. परंतु सर्वांना मदतनिधी मिळालेला नाही.

यासंबंधी काही महिन्यांपूर्वी तत्कालीन खासदार उन्मेष पाटील यांनीही केंद्राला साकडे घातले होते. अलीकडेच राज्याचे मंत्री अनिल पाटील, जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी या प्रश्नी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली आहे.

यानिमित्त एक बैठकही झाली. त्यात पाडळसे निम्न तापी प्रकल्पाचा केंद्रीय सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी करण्यात आली. यात पाडळसे प्रकल्पाची सर्व माहिती मंत्री पाटील यांनी दिली. या प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या टप्पा १ चा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत करण्यासंबंधी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने शिफारस केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT