Milk Price Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Price : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक; दूध दरासाठी कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

Milk Producer Farmers Sangharsh Committee : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आता दूध दराच्या प्रश्नावरून आक्रमक झाली आहे. कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले जाणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर विविध आंदोलन केली जात आहेत. तर 'संघर्ष सप्ताह' केला जात आहे. याचआंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये १७ दिवसांपासून धरणे आंदोलन केले जात आहे. तर आता मंगळवारी (ता.२३) कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले गेले आहे.

राज्यात दुधाच्या प्रश्नावरून संघर्ष समितीकडून जोरदार आंदोलन केले जात आहे. समितीच्या वतीने येथील कोतुळमध्ये आंदोलन केले जात आहे. या आंदोलनास १७ दिवस झाले असून सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एल्गार केला आहे. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने कोतुळ आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर व ट्रॉली रॅली काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही रॅली ५५ किलोमीटर अंतराची असेल. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये परिसरातील शेकडो शेतकरी ट्रॅक्टर व ट्रॉलीवर दूध उत्पादनाशी संबंधित विविध साधने सजवून सहभागी होणार आहेत.

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमचा सुटावा यासाठी दुधाला एफ. आर. पी. व रिव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, पशुखाद्याचे दर कमी करावेत, दूध भेसळ तातडीने थांबवावी, आदी मागण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.

दूध धंदयातील सर्व उत्पन्न सरकारच्या धोरणामुळे खाजगी व सहकारी दूध संघ व इतरांनी लुटून नेले आहे. शेतकऱ्याला या व्यवसायातून केवळ शेणच शिल्लक राहत आहे. अशा पार्श्वभूमीवर ते तरी कशाला ठेवता ते शेणही घेऊन जा, अशा प्रकारची शेतकऱ्यांमध्ये भावना आहे. ट्रॅक्टर रॅलीच्या सुरुवातीला शेणाने भरलेला ट्रॅक्टर असणार असून, हे शेण सुद्धा सरकारने घेऊन जावे अशा प्रकारची भावना या द्वारे व्यक्त केली जाणार आहे.

कोतुळ येथून निघणारी ही रॅली दूध उत्पादनाचा पट्टा असलेल्या धामणगाव पाट, धामणगाव आवारी, अकोले तहसील कार्यालय, कळस, चिखली मार्गे, संगमनेर शहरात दाखल होणार आहे. या रॅलीमध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेते डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

यावेळी सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव,योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार उपस्थित असतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT