Organic Agriculture Product Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Agriculture Produce : सेंद्रिय उत्पादनाचे प्रमाणीकरण आणि बाजारपेठ ; शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा

Organic Product Certification : ‘सेंद्रिय कृषी उत्पादनाचे प्रमाणीकरण, मानकीकरण, स्रोत आणि बाजारातील संधी’ या विषयावर प्रतामी ॲग्रो फाउंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. ५) एक दिवसीय कार्यशाळा येथे घेण्यात आली.

Team Agrowon

Washim News : ‘सेंद्रिय कृषी उत्पादनाचे प्रमाणीकरण, मानकीकरण, स्रोत आणि बाजारातील संधी’ या विषयावर प्रतामी ॲग्रो फाउंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. ५) एक दिवसीय कार्यशाळा येथे घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजूभाऊ चौधरी होते. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतामी ॲग्रो फाउंडेशनच्या मिनी चक्रवर्ती, हर्षल जैन आणि योगेश वंजारी होते. कार्यशाळेत वाशीम जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, सचिव, सभासद आणि विशेष कार्यकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. चौधरी यांनी विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा यासाठी प्रभावी धोरणे राबविण्याचे आवाहन केले. मिनी चक्रवर्ती यांनी फाउंडेशनचे कार्य, उद्देश तसेच शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री. जैन यांनी सेंद्रिय प्रमाणीकरणाची गरज, त्याचे फायदे, तसेच त्यासाठी आवश्यक असलेले विविध कागदपत्रे आणि प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. वंजारी यांनी सेंद्रिय उत्पादनासंबंधीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रांसह त्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यावर सखोल चर्चा केली.

डॉ. एस. के. देशमुख, डॉ. डी. एन. इंगोले आणि डॉ. निवृत्ती पाटील यांनी सेंद्रिय उत्पादनाच्या प्रमाणीकरण प्रक्रिया, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना, तसेच सेंद्रिय उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठीच्या धोरणांवर माहिती दिली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय उत्पादन, त्याच्या विक्री व्यवस्थापन, निर्यात धोरणे आणि सरकारी योजनांबाबत तज्ज्ञांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमाचे संचालन तनुश्री हिने केले. कृषी विज्ञान केंद्राचे संगणक तज्ज्ञ कृष्णा बावस्कर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT