Farmers Solapur agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Solapur : शेतकऱ्यांना विमा नाकारणाऱ्या कंपनीला परतावा देण्याचे आदेश

Kharip Season Solapur : खरीप व रब्बी हंगाम २०२३ मध्ये वर्षभरात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून एकूण १,५२,७७५ पीक नुकसानीच्या पूर्वसूचना कंपनीकडे देण्यात आल्या.

Team Agrowon

Solapur Kharip Season : खरीप व रब्बी हंगाम २०२३ मध्ये वर्षभरात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून एकूण १,५२,७७५ पीक नुकसानीच्या पूर्वसूचना कंपनीकडे देण्यात आल्या. त्यापैकी विविध कारणांमुळे १,२०,७१० पूर्वसूचना नाकारून कंपनीने शेतकऱ्याऱ्यांना विमा नामंजूर केला. यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी विभाग व महसूल विभागाकडे तक्रार केल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तक्रारींची दखल घेऊन पीक नुकसानीच्या पूर्वसूचना स्वीकारून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या पीक नुकसानीच्या पूर्वसूचनांबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी वारंवार याबाबत आढावा घेऊन, परिपत्रक काढून सीएससी केंद्र चालकांचे प्रशिक्षण, व्हॉट्सअप ग्रुपद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती, याम सुरक्षा यंत्राचा वापर आदींद्वारे पीक नुकसानीच्या पूर्वसूचना नाकारण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

विमा कंपनीस वेळोवेळी दिलेल्या सूचना, आदेश परिपत्रके, प्रशिक्षणे यामुळे खरीप २०२४ मध्ये पीक नुकसानीच्या पूर्वसूचना नाकारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. खरीप २०२४ मध्ये शेतकऱ्यांकडून दिलेल्या ३,०६,००० पूर्वसूचनांपैकी २,२७,००० (७४%) पूर्वसूचनांचा स्वीकार करून विमा कंपनीद्वारे २७८.७ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.

खरीप २०२४ मध्ये पीक नुकसानीचे पंचनामे व अहवाल तयार करण्यामध्ये अनियमितता असल्यामुळे विमा कंपनीकडे वारंवार स्थळ पंचनामा प्रत व छायाचित्रे याची मागणी वारंवार जिल्हास्तरीय आढावा बैठकीत करण्यात आलेली आहे. परंतु अ‌द्याप कंपनीकडून या बाबींची पूर्तता करण्यात आली नाही.

१६ मे २०२५ रोजी झालेल्या खरीप हंगाम पूर्व बैठकीमध्येही पुढील आठ दिवसांत विमा कंपनीने स्थळ पंचनामा प्रति, विमावाटप या‌द्या, रिजेक्शन याद्या व छायाचित्रे ‌द्यावीत अन्यथा पीकविमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT