Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : शेतकऱ्यांना तातडीने अग्रीम पीक विमा देण्याचे आदेश : धनंजय मुंडे

Unseasonal Rain : अवकाळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे एकत्रित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

Swapnil Shinde

Crop Insource News : राज्यात दुष्काळी परिस्थितीमध्येच अवकाळीचे संकट आले आहे. २२ जिल्ह्यातील ५० लाख शेतकऱ्यांना पीक विम्याच्या अग्रीम हप्ता मिळाला आहे. तांत्रिक बाबींमुळे काही शेतकऱ्यांना अजून लाभ मिळाला नाही. त्यांच्या खात्यावर तातडीने रक्कम जमा करण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मुंडे म्हणाले, महायुती सरकारने नेहमीच शेतकऱ्याच्या पाठिमागे उभे आहे. नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची योजना जाहीर केली. यंदा खरीप हंगामामध्ये १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला.

अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा २१ दिवसांचा खंड पडला आहे. अशा मंडलामधील पंचनामे करून २२ जिल्ह्यातील शेतकरी अग्रीम पीक विम्यासाठी पात्र ठरले आहे. दिवाळीपूर्वी ५० लाख शेतकऱ्यांना १ हजार ९५४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. अजून ही १ हजार १९ कोटी रुपये थकीत असून ती रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, असे आदेश कृषी आयुक्त दिले आहेत.

अवकाळी व गारपीटीमुळे द्राक्ष, कांदा आणि इतर फळभागांचे नुकसान झाले आहे. अशा भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनाम्याची कारवाई सुरू आहे. पंचनामे आल्यानंतर एनडीआरएफच्या निकर्षानुसार शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT