Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Survey : नुकसानग्रस्त सोयाबीन क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश

Soybean Crop Damage : सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोड- मूळकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे.

Team Agrowon

Akola News : सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोड- मूळकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे लेखी आदेश जिल्हा यंत्रणांना प्राप्त झाले आहेत.

यानुसार पंचनाम्यांचे काम लवकरच सुरु होणार आहे. तर दुसरीकडे सोयाबीन काढणीचा हंगाम वेग घेत असून काही ठिकाणी पीक काढूनही झाले. परिणामी पंचनामे कशाचे होणार हा प्रश्न सुद्धा शेतकरी आता विचारत आहेत.

या खरीप हंगामात पावसात मोठा खंड तसेच सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक, मूळ आणि खोडकुज या विषाणुजन्य व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. ३ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत आदेश देण्यात आले होते.

मंत्रिमंडळाचे निर्देश व कृषी विभागाचा प्रस्तावानुसार जिल्ह्यातील पिवळा मोझॅक, मूळकुज आणि खोडकुज याचा प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.

वाशीम जिल्ह्यात या रोगांचा प्रादुर्भाव झालेले क्षेत्र हे सुमारे ३६ हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. अकोल्यात १८ ते १९ हजार आणि बुलडाणा जिल्हयातही १९ हजार हेक्टरपर्यंत नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा यंत्रणांनी कळवलेला आहे.

पंचनामे कशाचे करणार?

सोयाबीन पिकाची काढणी सुरू झाली असून आतापर्यंत ५ ते १० टक्के क्षेत्रावरील सोयाबीन निघाले आहे. दररोज काढणी क्षेत्र वाढत चालले आहे. आता शासनाकडून या कीडरोगांमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रात पंचनाम्यांचे आदेश दोन दिवसांपूर्वी काढण्यात आले.

जेथे पीक काढणी झाली त्या ठिकाणी यंत्रणा कुठल्या गोष्टीचा पंचनामा करेल हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. पिवळा मोझॅक, मूळ-खोड किडीमुळे पिकाची उत्पादकता कमालीची खालावली आहे.

हलक्या जमिनीतील उत्पादकता एकरी दोन क्विंटलपासून आहे, तर मध्यम व भारी जमिनीत यंदा ५ ते ८ क्विंटलदरम्यान उतारा मिळतो आहे. दरवर्षी या क्षेत्रात सरासरी ८ ते १० क्विंटलदरम्यान उत्पादन येत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT