Orange Rate Update Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Rate : संत्रा उत्पादकांना मिळाली व्यापाऱ्यांकडून भाववाढ

सौदा पावतीनंतर दरात वाढ झाली त्यामुळे वाढीव दरानुसार संत्रा फळांचे पैसे मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु त्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला.

Team Agrowon

Amravati News : सौदा पावतीनंतर दरात वाढ झाली त्यामुळे वाढीव दरानुसार संत्रा फळांचे पैसे मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु त्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला.

पोलिस ठाण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. मात्र सामंजस्याने तोडगा काढत शेतकऱ्याला वाढीव दराने रक्कम देण्यासाठी व्यापाऱ्याने सहमती दर्शविली. शेतकरी एकजुटीचा हा विजय मानला जात आहे.

कासमपूर येथील एका संत्राउत्पादक शेतकऱ्याचा सौदा पथ्रोट येथील एका संत्रा व्यापाऱ्यासोबत अडीच लाख रुपयांत झाला होता.

त्यावेळी ठरलेल्या रकमेपैकी उर्वरित देय असलेली दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन व्यापारी संत्रा तोडण्यासाठी सदर शेतकऱ्याच्या बगीच्यात मजूर घेऊन गेले होते.

त्या वेळी बाजारपेठेत संत्राफळांची किंमत वाढलेली असल्यामुळे आम्हाला अधिकची रक्कम हवी, अशी मागणी शेतकऱ्याने व्यापाऱ्याकडे केली.

परंतु सुरुवातीला त्या व्यवहाराकडे दुर्लक्ष करीत सौदापावतीनुसार ठरलेली रक्कम देऊन फळ तोडण्यासाठी व्यापारी आपल्या मतावर ठाम होते, तर भाववाढ घेण्यावर शेतकरी ठाम होते.

त्या वेळी दोघांमध्ये एक मत न झाल्यामुळे सदर प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. त्या ठिकाणी व्यापाऱ्याने एक लाख रुपये अधिक द्यावे, अशी मागणी वजा मत शेतकऱ्याने पोलिसांसमोर ठेवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तूर बाजारात चढ-उतार, गवार दरात वाढ, बटाटा बाजारात आवक वाढली, हिरव्या मिरचीच्या दरात बदल तर पपईचे दर टिकून

LPG Subsidy Rule: एलपीजी सिलिंडरच्या अनुदानाबाबत मोठा बदल; १ ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य

Rainfall Deficit: पावसाच्या खंडाने पिकांवर विपरित परिणाम

Drought Like Conditions: नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांत ट्रिगर-१ लागू

Fodder Farming: चारा पिकांच्या लागवडीला रब्बी हंगामात प्राधान्य देणार: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन

SCROLL FOR NEXT