Orange Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Crop Insurance : संत्रा बागायतदारांना मिळणार सुमारे १४ कोटी रुपयांचा विमा

Fruit Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ मध्ये संत्रा, मोसंबी बागधारकांनी भाग घेतला. यात मोसंबी, केळी, संत्रा या फळपिकांचा समावेश होता.

Team Agrowon

Amaravati News : फळपीक विमा मंजुरीनंतरही राज्याने आपला हिस्सा कंपनीकडे जमा केला नाही. परिणामी १३.९३ कोटी रुपयांची भरपाई रखडली होती. आता राज्य हिस्सा जमा झाल्याने लवकरच फळपीकविम्याची रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ मध्ये संत्रा, मोसंबी बागधारकांनी भाग घेतला. यात मोसंबी, केळी, संत्रा या फळपिकांचा समावेश होता. दरम्यान, हंगामात संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

पीकविमा कंपनीने जिल्ह्यातील ३१५६ शेतकऱ्यांच्या ३३२० हेक्‍टरवरील फळपिकांच्या नुकसानीसाठी विमा भरपाई मंजूर केली. मात्र, राज्य सरकारकडून त्यांचा हिस्सा देण्यास टाळाटाळ केली जात होती. परिणामी शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोर्शी तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी ही रक्‍कम जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला

होता, तर आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे या बाबत पाठपुरावा केला. शेतकऱ्यांनी आपापल्या स्तरावर निवेदने दिली. त्याची दखल घेत अखेरीस राज्य सरकारने आपला हिस्सा जमा केला. त्यामुळे विमा भरपाईची १३.९१ कोटी रुपयांची रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT