Assembly Monsoon Session 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Monsoon Session : शेतकरी वाऱ्यावर, सरकार भ्रष्टाचारी ः विरोधकांची टीका

Maharashtra Politics : राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था आणि भ्रष्टाचारात मंत्री बरबटल्याने या सरकारच्या चहापानाला जाणे संवेदनाशून्य असेल, अशी टीका करत विरोधकांनी बहिष्कार टाकला.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : महायुती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांना कपडे, चप्पल दिल्याचे सांगत नेते शेतकऱ्यांवर असंवेदनशीलपणे बोलत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था आणि भ्रष्टाचारात मंत्री बरबटल्याने या सरकारच्या चहापानाला जाणे संवेदनाशून्य असेल, अशी टीका करत विरोधकांनी बहिष्कार टाकला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी (ता. २९) पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांच्यासह शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

सत्ताधारी पक्षाचे लोकं वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत, पोलिसांचे त्यांना संरक्षण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना प्रोत्साहन देत आहेत. नेमके भाजप आणि गद्दारांनी आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे : सतेज पाटील

शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यांतील शेतकरी विरोध करत आहे. त्याला राजकीय रंग का दिला जातोय, असा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असून गरज नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

या बैठकीला शिवसेनेचे प्रतोद व आमदार सुनील प्रभू, आमदार सचिन अहीर, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ उपनेते अमीन पटेल, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT