Marathi Sahity Sammelan  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनात राजकारण्यांची भाऊगर्दी; मुख्य कार्यक्रमांना व्यासपीठावर दोनच साहित्यिक

Latest Marathi News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटन व समारोपीय सोहळ्याला व्यासपीठावर साहित्यिक म्हणून केवळ आजी-माजी संमेलनाध्यक्ष दिसणार आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटन व समारोपीय सोहळ्याला व्यासपीठावर साहित्यिक म्हणून केवळ आजी-माजी संमेलनाध्यक्ष दिसणार आहे. त्याउलट, या मुख्य कार्यक्रमांना १२ राजकारण्यांना निमंत्रित म्हणून स्थान दिल्याचे पत्रिकेतून स्पष्ट होत आहे. परिसंवादाचे काही विषयही राजकीय अंगाने जात असल्याने साहित्य वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.

साहित्य महामंडळाच्या अमळनेर येथील मराठी वाङ्‍मय मंडळाने यजमानपद स्वीकारलेले ९७ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारीला प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. शासनाचा निधी मिळावा म्हणून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची माळ त्या भागातील मोठ्या नेत्याच्या गळ्यात घातली जाते.

अमळनेर संमेलनात ही माळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात पडल्याने आपोआपच संमेलनावर राजकीय वरचष्मा दिसत आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे संमेलनाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय मुख्य कार्यक्रमांना महायुतीतील महत्त्वाचे मंत्री येणार असल्याने खानदेशातील सर्व आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतील. इतर कार्यक्रमांमध्ये अरुण गुजराथी, युवराज मोहिते अशीही काही नावे आहेत.

उद्‍घाटनाला सुमित्रा महाजन, उपमुख्यमंत्री

संमेलनाचे उद्‍घाटन साहित्यिकांच्या हस्ते व्हावे, अशी अपेक्षा नेहमीच साहित्य वर्तुळातून व्यक्त होते. मात्र, तसे घडत नाही. अमळनेरच्या संमेलनाचे उद्‍घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन करतील. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे विशेष निमंत्रित आहेत.

समारोपाला गडकरी, मुख्यमंत्री शिंदे

समारोपालाही ज्येष्ठ साहित्यिक नाही. प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रण आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, विधान सभेच्या उपसभापती नोलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT