Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Product Export Ban : ज्यांनी केली शेतीमालाची निर्यातबंदी, त्यांनाच मतदानबंदी

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारने वारंवार हस्तक्षेप करून कांद्याचे दर पाडले आहेत. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यात उत्पादन कमी असून आवक तुलनेत कमी असताना दोन पैसे शेतकऱ्यांच्या पदरी पडत होते.

मात्र केंद्र सरकारने ग्राहकहिताचा विचार करून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा पट्ट्यात शेतकऱ्यांचा संताप कायम आहे. असे असताना शेलू (ता. चांदवड) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी ‘ज्यांनी केली शेतीमालाची निर्यातबंदी, त्यांनाच मतदानबंदी’ असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकार सातत्याने शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे, तर ग्राहक हित साधत आहे. ते मनमानी निर्णय घेतात. त्यामुळे आमचा निर्णय आता आम्ही घेऊन मतदानबंदी करणार आहोत असा सूर गावातील शेतकऱ्यांमध्ये दिसून आला.

गावात एकत्र येत शेतकऱ्यांनी ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा दिल्या. ‘आमच्या शेतीमालाची माती केली, त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचं नाही’, ‘ज्यांनी केली वारंवार शेतीमालाची निर्यातबंदी, त्यांना आता नकोच सत्तेची संधी’, असलेला फलक गावात लावला आहे.

या वेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या हस्ते फलक लावण्यात आला. या वेळी सूर्यभान जाधव, केशव जाधव, साहेबराव जाधव, माजी सरपंच शिवाजी जाधव, सचिन जाधव, संजय जाधव, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते.

शेतकरी चळवळीच्या गावात शेतकऱ्यांची नवी भूमिका

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांना साथ देणारे हे गाव आहे. या गावातील अनेक कार्यकर्ते शेतकरी संघटनेशी जोडलेले आहेत. यापूर्वी येथे अनेक चळवळी येथे झाल्या. आता गावात कांदा निर्यात बंदीनंतर मतदानबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या गावांमध्ये त्याचा परिणाम काय होतो हे पाहणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणास विरोध करीत राजकीय निर्णय घेतल्याने सरकारविरोधात वातावरण तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT