Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti: मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या केवळ वल्गनाच

Fertilizer Scam: खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांवर खते विक्रीतील लिंकिंग, जादा दर व बोगस खतांची जबरदस्ती सुरू असून, यावर मुख्यमंत्री व कृषिमंत्री गप्प बसल्याची जोरदार टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: खरीप हंगाम तोंडावर आल्याने राज्यामध्ये शेतकरी खते खरेदी करत असताना शेतकऱ्यांना सर्रास लिंकिंगची बोगस खतांची सक्ती केली जात असून युरिया, पोटॅश, डीएपी यांसारखी खते किमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी फक्त वल्गना करून अधिकाऱ्यांच्या आड शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.

राज्यामध्ये खरीप हंगामाकरिता खताची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. केंद्र सरकारकडून अनुदान घेणाऱ्या खत कंपन्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये खताची रेक आल्यानंतर जिल्ह्यातील होलसेल खत विक्रेत्यांकडून त्या खतासोबत नॅनो युरियासह सूक्ष्म अन्नद्रव्ये व इतर खताची लिंकिंग केली जात आहे.

ग्रामीण भागातील खत विक्रेत्याकडे खताच्या पोत्यावरील किमतीपेक्षा जादा दराने खत विक्री होत आहे. विशेषकरून युरिया खताची किंमत २६५ रुपये असताना टंचाई दाखवून जवळपास ३०० ते ४०० रुपयांना विकले जात आहे.

राज्याच्या गुणनियंत्रण विभागाचे या खत कंपन्यांवर कोणतेच नियंत्रण राहिले नसून कृषी विभागातील अधिकारी सर्रास कृषी निविष्ठा दुकानदार यांच्याकडून हप्ते गोळा करत असून, कृषी विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे खत कंपन्यासोबत भागीदारी व आर्थिक हितसंबंध आहेत. लिंकिंग व जादा दराने होणारी खतविक्री थांबवावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

लिंकिंग होत असल्यास ‘स्वाभिमानी’शी संपर्क साधा

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी कुठेही लिंकिंग अथवा छापील किमतीपेक्षा जादा दराने खताची विक्री होत असेल तर संबंधित जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांना संपर्क साधावे. त्यांना खते उपलब्ध करून दिली जातील. मात्र लिंकिंगने बोगस खताची खरेदी करू नये, असे आवाहन श्री. शेट्टी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

SCROLL FOR NEXT