Sugarcane Harvesting Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ऊस तोडीची ५० टक्केच यंत्रणा जिल्ह्यात दाखल

Sugarcane Harvesting : देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे यंदाच्या गळीत हंगामाबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

Team Agrowon

Solapur News : देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे यंदाच्या गळीत हंगामाबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच या वर्षी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने विदर्भ-मराठवाड्यातील ऊसतोड कामगार जिल्ह्यात दाखल होण्यास विलंब होत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्केच यंत्रणा दाखल झाली असून ५० टक्के यंत्रणा निवडणुकीनंतरच जिल्ह्यात दाखल होईल, अशी शक्यता आहे. यंदाचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विधानसभेच्या ऐन निवडणुकीत साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यंदा आल्याने सर्वांचीच धांदल उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील जवळपास नऊ साखर कारखानदार यंदा विधानसभा निवडणुकीसाठी नशीब अजमावत आहेत. या शिवाय अनेक साखर कारखानदार त्या-त्या भागातील मतदारसंघाचे गेम चेंजर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदार हे प्रचाराच्या रणधुमाळीत अडकले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पडझड झाली, महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली, त्यामुळे मराठवाड्यावर सर्वच नेत्यांचे विशेष लक्ष आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी असल्याने ही प्रक्रिया झाल्यानंतरच या भागातील ऊस तोड कामगार सोलापूर जिल्ह्यात दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात १६४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. गेल्या वर्षी पावसाने मारलेली दडी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा झालेला वापर या कारणांमुळे यंदाच्या हंगामासाठी ऊस कमी असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम यंदाचा गळीत हंगाम उशिरा सुरू होऊन लवकरच संपण्याची दाट शक्यता आहे.

यावर्षी उसाचे क्षेत्र जरी कमी असले तरीही जूनच्या सुरवातीपासून झालेला पाऊस, वेळेत भरलेले उजनी धरण व त्यानंतरही पावसाने लावलेली दमदार हजेरी यामुळे उसाचे वजन चांगले येईल. यंदाचा हंगाम शंभर ते १२० दिवसांचा होण्याची शक्यता आहे. हंगामासाठी आवश्‍यक असलेली आमची तयारी पूर्ण झालेली आहे.
- सचिन जाधव, कार्यकारी संचालक, जकराया शुगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT