Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean MSP Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदी केवळ २६ टक्के

Soybean Procurement Registration Deadline : राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खेरदीसाठी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. फक्त नोंदणीला मुदतवाढ दिली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खेरदीसाठी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. फक्त नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. मात्र खरेदीची मुदत अद्यापही वाढविण्यात आली नाही. राज्यात १४ लाख १३ हजार टन खेरदीचे उद्दिष्ट असताना केवळ ३ लाख ६४ हजार टनांचीच खरेदी झाली आहे.

सरकारने यंदा राज्यात १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खेरदीचे उद्दिष्ट ठेवले होते. १५ ऑक्टोबर ते १२ जानेवारी दरम्यान खरेदी करण्याची मुदत देण्यात आली. तर हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र नोंदणीतील अडचणींमुळे शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होऊ शकली नाही.

सोयाबीन खरेदीमधील अडचणी सुरुवातीपासूनच कायम आहेत. हमीभावाने खरेदी करण्यासाठी सरकारने यंदा ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे नोंदणीत अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांना वेळेत एसएमएस मिळत नाहीत. कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी आहेत. या सगळ्या कारणांमुळे नोंदणी प्रक्रीया संथ गतीने सुरू आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत केवळ ३ लाख ६४ हजार टन सोयाबीनची खरेदी पूर्ण करण्यात आली. म्हणजेच एकूण उद्दिष्टाच्या केवळ २६ टक्के खरेदी पूर्ण झाली. आतापर्यंत १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

राज्यात सध्या ५६१ खेरदी केंद्रे सुरू असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. राज्यात खेरदी केंद्रे जास्त असावीत अशी मागणी सुरुवातीपासूनच केली जात होती. कारण नोंदणी आणि खरेदीतील अडचणी लक्षात घेता उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, याची शंका आधीपासूनच व्यक्त केली जात होती. पण सरकारने याकडे लक्ष दिले नाही. खरेदी केंद्रे कमी असल्याने आणि अडचणी कायम असल्याने खेरदीचा बोजवारा उडाला.

सोयाबीन खरेदीची मुदत दोन महिने वाढवा

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नोंदणीची मुदत ३१ डिसेंबरपासून ६ जानेवारीपर्यंत वाढविली. मात्र खरेदीची मुदत अद्यापही वाढवली नाही. मुळात ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचेच सोयाबीन १२ जानेवारीपर्यंत खरेदी होऊ शकणार नाही. मग ६ जानेवारीपर्यंत नोंदणी होणाऱ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन कसे खरेदी होणार? राज्य सरकारने खेरदीची मुदतही दोन महिने वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT