Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Distribution : खरीप हंगामात फक्त २५ टक्के पीककर्जाचे वाटप

Kharif Season : खरिपातील शेतीचा हंगाम सुरू झाला. शेतकरी कामाला लागले. शेतकऱ्यांना खते, बियाणांसाठी पैशाची गरज आहे. बॅंकेतून कर्जाच्या माध्यमातून शेतकरी पैसे उभारून गरज भागवतो. परंतु त्यांची ही गरज भागवण्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचा आखडता हात असल्याचे दिसते.

Team Agrowon

Nagpur News : खरिपातील शेतीचा हंगाम सुरू झाला. शेतकरी कामाला लागले. शेतकऱ्यांना खते, बियाणांसाठी पैशाची गरज आहे. बॅंकेतून कर्जाच्या माध्यमातून शेतकरी पैसे उभारून गरज भागवतो. परंतु त्यांची ही गरज भागवण्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचा आखडता हात असल्याचे दिसते. आतापर्यंत फक्त २५ टक्केच पीक कर्जाचे वाटप झाले आहे.

यंदा खरीप हंगामात १ लाख २६ हजार ३५० सभासदांना १५०० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पीक कर्जाचे उद्दिष्ट वाटपासाठी यंदा सरकारने विलंब केला. मागील वर्षी १४६६ कोटींचे उद्दिष्ट होते.

त्यातील १०२९ कोटींचे वाटप झाले होते. सुरवातील शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास मोठे अडथळे आहे. परंतु शासन व जिल्हाधिकारी यांनी बॅंकांच्या वारंवार बैठका घेतल्याने प्रक्रिया काहीशी सुलभ झाली होती.

शेतीचा हंगाम सुरू झाल्याने खते, बियाणांची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. यंदाही शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅंकांकडून कर्ज वाटपासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.यंदा १५०० कोटींचे उद्दिष्ट असून आतापर्यंत २६,७४० सदस्यांना ३७६.३६ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT