Rabi Crops MSP agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे १८ टक्के पीककर्ज वितरण

Rabi Season : दुष्काळामुळे रब्बी हंगामात पीक कर्जाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

Team Agrowon

Satara News : दुष्काळामुळे रब्बी हंगामात पीक कर्जाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर अवघे १८ टक्के कर्ज वितरण झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उर्वरित चार महिन्यांत किती उद्दिष्ट पूर्ण होणार हे पाहावे लागणार आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १०८० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी नोव्हेंबरअखेर १९३ कोटी ८९ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. दोन महिन्यांत अवघे १८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. खरिपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केले होते.

तर रब्बीत राष्ट्रीयीकृत बँकांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना ३१३ कोटी ५० लाखांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून, यापैकी १५३ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ४९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. खासगी बॅंकांना १७२ कोटी ५० लाखांच्या उद्दिष्टापैकी ३६ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.

खासगी बँकांनी २१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ५९२ कोटी ५० लाख रुपयांचा उद्दिष्टापैकी तीन कोटी ६७ लाख म्हणजेच एक टक्के कर्जाचे वितरण केले आहे.

रब्बी कर्ज वितरण सुरू होऊन दोन महिने उलटले असून, कर्ज वितरण करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. उर्वरित कालवधीत किती कर्जवाटप होईल हे पाहावे लागणार आहे.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पाठ

जिल्ह्यातील अनेक भागांस तीव्र दुष्काळाच्या झळा बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीककर्ज घेण्याकडे पाठ फिरवली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पूर्वीचेच कर्ज थकित असल्याने नवीन कर्ज घेतले जात नाही. पीककर्जाबाबत काही बॅँकांची धोरणे उदासीन असल्याने एकूण कर्ज वितरणावर परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT