Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Auction : नीरा येथे शनिवारपासून कांदा लिलाव सुरू होणार

Neera APMC : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारपासून (ता. १३) कांदा लिलाव सुरू करण्यात येणार आहेत. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. १०) व्यापारी व संचालक मंडळाची बैठक पार पडली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारपासून (ता. १३) कांदा लिलाव सुरू करण्यात येणार आहेत. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. १०) व्यापारी व संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दत्त जयंतीचे औचित्य साधून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असल्याची माहिती सभापती शरद जगताप यांनी माध्यमांना दिली.

या वेळी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप, संचालक अशोक निगडे, सुशांत कांबळे, बाळासाहेब जगदाळे, भाऊसाहेब गुलदगड, राजकुमार शहा, विक्रम दगडे, व्यापारी, लेखापाल नितीन किकले, कृष्णांत खलाटे उपस्थित होते.

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या वर्षीपासून या नीरा येथील मुख्य बाजारात कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यांतील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना जवळच बाजार उपलब्ध झाला होता.

मध्यंतरीच्या काळात कांद्याची आवक बंद झाल्याने लिलाव थांबविण्यात आले होते. आता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात कांदे काढणी सुरू असून या कांद्याला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्याला अनुसरून शनिवारपासून नीरा येथे मुख्य बाजारात कांदा निलाव सुरू करण्यात येणार आहेत.

आठवड्यातून एकदाच लिलाव

या वर्षी देखील दर शनिवार म्हणजेच आठवड्यातून एकदा कांद्याचा लिलाव होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नीरा कृषी उत्पन्न समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आणावा असा आवाहन नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शरद जगताप यांनी केले आहे. तर लिलावानंतर त्याच दिवशी शेतकऱ्यांना पट्टी दिली जाईल. त्याचबरोबर सर्व व्यवहार पारदर्शकपणे केले जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT