Onion Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’मार्फत कांदा बाजार समितीत विक्री करावा

NAFED : केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण निधी योजनेमार्फत ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या संस्थांमार्फत खरेदी केलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी खालावली आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक : केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण निधी योजनेमार्फत ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या संस्थांमार्फत खरेदी केलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी खालावली आहे. उन्हाळ कांद्याची विक्री लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी ग्राहक कल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

लासलगाव बाजार समिती आशिया खंडातील नावाजलेली बाजार समिती आहे. सद्यःस्थितीत उन्हाळ कांद्याची बाजार समिती आवारावर कमतरता आहे. सध्या देशभरातून उन्हाळ कांद्याची मागणी जास्त आहे.

उन्हाळ कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी बाजार समिती सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, परंतु त्यासाठी उन्हाळ कांदा उपलब्ध होत नाही. केंद्र सरकारने  नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांमार्फत कांदा साठवून ठेवला आहे. त्यातील ‘बी’ ग्रेड कांदा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या कांद्याला लासलगाव बाजार समितीत वीस रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त भाव मिळत आहे. त्याची मागणी जास्त असल्यामुळे आवक कमी असल्यामुळे मागणीची पूर्तता होत नाही. त्यामुळे नाफेड व एनसीसीएफ यांच्याकडील ‘बी’ ग्रेड कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारावर विक्रीस आणल्यास त्यास वीस रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्तीचा बाजार भाव मिळून शासनाचा फायदा होईल व बाजार समितीचाही फायदा होईल.

यासाठी लासलगाव बाजार समितीच्या वतीने ग्राहक कल्याण विभागाचे सेक्रेटरी यांच्याकडे ई-मेलद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT