Onion Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed Rate : कांदा बियाण्याचे दर स्थिरावले

Onion Seed Market : शेतकऱ्यांकडून ६०० ते १००० रुपये किलोने विक्री

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Onion Cultivation : धुळे : खानदेशात खरिपातील कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या जात असून, कांदा बियाण्याचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.

मध्यंतरी दरवाढ सुरूच राहील किंवा बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल, अशी स्थिती होती. परंतु बियाणे दर स्थिर आहे. नव्याने बियाणे खरेदीची गरज फारशी सध्या नाही. परिणामी, कांदा बियाणे बाजारातील तेजीही कमी होत आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी दर्जेदार बियाण्याची विक्री करीत आहेत. बियाणे उगवणीशिवाय पैसे देऊ नका, अशी हमी घेऊनही काही शेतकरी बियाणे विक्री करीत आहेत.

धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर, जळगाव जिल्ह्यात जळगाव, एरंडोल, धरणगाव, रावेर, चोपडा आदी भागांत अनेक कांदा बियाणे विक्रेते शेतकरी आहेत. ६००, ९००, १००० आणि १२०० रुपये प्रतिकिलो या दरात बियाण्यांची विक्री ही मंडळी करीत आहे. यंदा रोपवाटिकांची संख्याही अधिक आहे. अनेक शेतकरी कांदा पिकांकडे वळत असल्याची स्थिती आहे. लागवडही वाढेल, असा अंदाज आहे. यामुळे कांदा बियाण्यात तेजी येईल, असे दिसत होते. यातच या महिन्यातील उष्णतेने प्रतिकूल वातावरण तयार झाले. उष्णता, उष्ण वारे, पाऊस, अशी स्थिती होती. यात बियाण्याची उगवण व्यवस्थित होईल की नाही, अशी भीतीही आहे. यामुळे रोपवाटिकांत बियाणे पेरणी अनेकांनी टाळली आहे.

काही शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून रोपवाटिकांमध्ये बियाण्याची उगवणक्षमता टिकविली आहे. ठिबकच्या मदतीने हवे तेवढे सिंचन शेतकरी करीत आहेत. रोपवाटिकांमध्ये बियाणे बऱ्यापैकी उगवत असल्याने पुढे बियाण्याची मागणी फारशी राहणार नाही, कारण नव्याने किंवा दुबार रोपवाटिका निर्मितीची गरज अपवाद वगळता सध्या नाही. यामुळे बियाण्यातील दरवाढ थांबली आहे. दर स्थिरावल्याने उशिरा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


धुळ्यात अधिक लागवडीची स्थिती
आगाप कांद्याची लागवड धुळे जिल्ह्यात अधिक होईल. साक्री, शिंदखेडा भागांत ही लागवड अधिक असणार आहे. तर जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा आदी भागांत लागवड होईल, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT