Onion Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Pending Payment in Nashik : कांदा उत्पादकांचे थकित पैसे देण्याची मागणी

शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांमध्ये वेळोवेळी संबंधित बाजार समित्यांमध्ये सतत चकरा मारूनही अजूनही शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा विक्रीचे पैसे मिळालेले नाहीत.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये (APMC) शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे अडकलेले आहेत. संबंधित बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची संपूर्ण थकीत रक्कम अदा करावी. त्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा.

शेतकऱ्यांचे थकीत असलेले पैसे जोपर्यंत दिले जात नाहीत; तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे थांबवावी अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांकडून बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया रोखली जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे.

सोमवारी (ता. २७) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सतीश खरे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन बाजार समिती निवडणूक स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

मात्र अशातच ही मागणी समोर आल्याने बाजार समित्यांमधील अनागोंदी पुन्हा समोर आली आहे.

शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करून दोन दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी सिन्नर, उमराणा, येवल्यासह काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे कोट्यवधी रुपये बाजार समितीत शेतमाल खरेदीचे अधिकृत परवाने असलेल्या व्यापाऱ्यांकडे बाकी असल्याबाबत निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांमध्ये वेळोवेळी संबंधित बाजार समित्यांमध्ये सतत चकरा मारूनही अजूनही शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा विक्रीचे पैसे मिळालेले नाहीत.

शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री केल्यानंतर २४ तासांच्या आत शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम अदा करण्याचा शासन नियम असतानाही गेल्या काही वर्षांपासून आपल्या अधिकारात सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे नेमकी किती रक्कम थकीत आहे याची तत्काळ दोन दिवसांत माहिती मागून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT