Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घरसण

Onion Market : रोजच्या वापरात अत्यावश्यक असणाऱ्या कांद्याचे भाव कमी झाल्याने गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील काही महिने कांद्याचे सरासरी भाव २५ ते ३५ रुपयांच्या वर पोहोचले होते; मात्र आता आवक वाढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारात भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

Team Agrowon

Mumbai Market : तुर्भे : रोजच्या वापरात अत्यावश्यक असणाऱ्या कांद्याचे भाव कमी झाल्याने गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील काही महिने कांद्याचे सरासरी भाव २५ ते ३५ रुपयांच्या वर पोहोचले होते; मात्र आता आवक वाढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारात भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मागील आठवड्यापासून १० ते १५ रुपयांनी प्रतिकिलो कांद्याची विक्री होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मागणीच्या तुलनेत लाल आणि पांढऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून भाव कमी होत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी ३० ते ४० रुपयांपर्यंत भाव मिळत होता; मात्र आठवड्यापूर्वी भाव १५ ते २० रुपये प्रतिकिलो झाला आहे. मंगळवारी (ता. १८) वाशी एपीएमसीत ५१ ट्रक, ६१ टेम्पो अशा ११२ वाहनांची आवक झाली आहे. यामध्ये २५ हजार ९९० गोणी कांदा आहे. ही आवक नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगलीमधून झाली आहे.

महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक कांद्याचे उत्पादन वाढले असल्याने भाव कमी होण्याची शक्यता आहे. हे भाव १५ एप्रिलपर्यंत असेच राहणार असून, आता जुना साठवणीतला कांदा बाजारात लवकरच दाखल होणार असल्याने भाव आणखी उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जाते.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याची राज्या बाहेरून मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहेत, याचा फटका कांदा उत्पादकांना बसणार आहे.

उन्हाळी कांदा हा पुढील आठ महिने चांगला राहू शकतो. त्यामुळे साठवण केली जात असल्याने कांद्याची किंमत कमी होत आहे. जुना कांदा बाजारात आला की कांद्याच्या भावात आणखी घसरण होऊ शकते.

- दिगंबर राऊत,

घाऊक व्यापारी, एपीएमसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार

Maize Ethanol Project: महाराष्ट्रात उभारणार मका पीक आधारित नवा इथेनॉल प्रकल्प, राज्य सरकारकडून ११५ कोटी निधीला मुंजरी

Cotton Farming Guidance: कोंढवड येथे कापूस उत्पादकांना शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT