Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे; पवारांनी टोचले केंद्र सरकारचे कान

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सोमवारी (ता.११) शरद पवारांनी नाशिक जिल्ह्यात आंदोलन केले.

Dhananjay Sanap

"कांदा जिरायत शेतकऱ्यांचे पीक आहे, दोन पैसे त्यातून मिळतात. म्हणून तुम्ही सारे कष्ट करता. पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवण्याचे अधिकार आहे, त्यांना तुमच्या कष्टाला किंमत द्यावी, ही भावना येत नाही. " अशी टीका शरद पवारांनी केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणावर केली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सोमवारी (ता.११) शरद पवारांनी नाशिक जिल्ह्यात आंदोलन केले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होत मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको केला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा विरोध केला. आंदोलक शेतकरी आणि नेत्यांनी यावेळी कांदा निर्यातीमुळे झालेल्या कोंडीची व्यथा मांडली.

पुढे पवार म्हणाले, "कांद्याची निर्यातबंदी उठलीच पाहिजे. आम्हाला रास्तारोको करण्याची हौस नाही. लोकांना त्रास देण्याची हौस नाही. पण रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय दिल्लीला जाग येत नाही. आज आपण रस्त्यावर उतरलो. एकत्र जमलो. मला खात्री आहे, दिल्लीची (केंद्र सरकारची) झोप उडाली आहे. केंद्र सरकारमध्ये जे बसले आहेत, त्यांना जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त होईल." यावेळी पवारांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयावर सडकून टीका केली.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. राज्यात कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाणिज्य मंत्र्याशी बोलणे झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, " मी स्वत: वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोललो आहे. त्यांना राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका सांगितली आहे. कांदा प्रश्नी सकारात्मक निर्णय होईल." असे मुख्यमंत्री म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT