Onion Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop : आळेफाटा परिसरात कांदा पीक फुलोऱ्यात

Onion Seed Production : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील शेतकऱ्यांचा कांदा बीजोत्पादन करण्याकडे कल वाढला आहे.

Team Agrowon

Pune News : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील शेतकऱ्यांचा कांदा बीजोत्पादन करण्याकडे कल वाढला आहे. राजुरी येथील रघुनाथ हाडवळे यांनी कांदा बीजोत्पादनासाठी लावलेले कांदा पीक भरण्याच्या अवस्थेत असून, ते फुलोऱ्यात आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये यंदा चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गतवर्षी कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी बियाण्यांना सोन्याचा बाजारभाव प्राप्त झाला होता.

एक हजार रुपयांना मिळणारे कांदा बी पाच हजार रुपयांपर्यंत ने शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. त्यातच कंपन्यांकडून आलेल्या बोगस बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता.

बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात बी तयार केले असून, कांदा बी तयार करण्यासाठी नैसर्गिक परागीकरण होणे गरजेचे असते. यासाठी मधमाशी हा महत्त्वाचा घटक असतो.

अलीकडच्या काळात मधमाशांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. बेसुमार व प्रभावी कीटकनाशकांमुळे मधमाशीचे जीवनचक्र संपुष्टात आले आहे. परागीकरण न झाल्याने कांदा बीजोत्पादनाची वाढ खुंटली आहे.

मधमाश्‍यांअभावी उत्पादन घटणार

कांदा बियाणे तयार करणारा प्लॉट यावर्षी जोमात असून मधमाश्‍यांचा तुटवडा असल्याने परागीकरण न झाल्याने अनेक गोंडे मोकळे आहेत. मधमाश्‍यांचे वास्तव्य नसल्याने उत्पादनात ५० टक्के घट येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shirdi Highway : अहिल्यानगर-शिर्डी रस्ता भाजपच्या नाकर्तेपणामुळे रखडलाय : पवार

Rainfall Deficit: परभणीत ८७.२, हिंगोलीत ८२.९ मिमी पावसाची तूट

Satara Development : साताऱ्याला अत्याधुनिक जिल्हा बनवणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

Sugarcane Harvesting Mechanisation: शेतकरी हित आणि सहकाराची परंपरा जपत कारखाना प्रगतिपथावर : आमदार अमित देशमुख

Satara Ration Card : साताऱ्यात ५७ हजार शिधापत्रिका अपात्र

SCROLL FOR NEXT