Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली; दरात घसरण, वळवाचा फटका शेतकऱ्यांना

Onion Production : दरम्यान कांदा उत्पादन पट्ट्यात पावसाची शक्यतेने कांद्याची आवक वाढल्याचे बोलले जात आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Market Yard : कोल्हापूर आणि कोकणाला संलग्न असणाऱ्या शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत चार दिवसांत कांद्यांची आवक वाढली. त्यामुळे कांद्याचे भाव घसरले असून १४० रुपये दहा किलो असा घाऊक भाव आहे.

किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर आहेत. दरम्यान कांदा उत्पादन पट्ट्यात पावसाची शक्यतेने कांद्याची आवक वाढल्याचे बोलले जात आहे.

गेल्या आठवड्याभरात राज्यातील विशेषतः कांदा उत्पादन पट्ट्यात ढगाळ वातावरण, वळीव पावसाची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा भिजून नुकसान होऊ नये यासाठी बहुतांशी कांदा बाजारपेठेकडे पाठवला. त्यामुळे कोल्हापुरात रोज सरासरी ४० गाड्या कांदा मालाची आवक होत आहे.

एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आला तसेच यंदा कोकण व गोव्यात पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे कांद्याला मागणी नाही. अशा स्थितीत कांदा येथे पडून राहण्याची शक्यता वाढली. त्यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत. चार दिवसांत कांद्या भाव कमी झाले असले तरी कमी भावातील कांदा किरकोळ बाजारपेठेत आलेला नाही.

त्यामुळे मागील आठवड्यात सरासरी ८० ते २५० रुपये दहा किलो प्रमाणे खरेदी केलेला कांदाचा किरकोळ बाजारपेठेत २० ते २५ रुपये एक किलो भावात विकला जात आहे.

घसरलेले भाव असे

शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारात प्रथम श्रेणी कांद्याचे भाव १४० रुपये दहा किलो, व्दितीय श्रेणी कांद्याचे भाव १०० रुपये तर तृतीय श्रेणी कांद्याचे भाव ६० रुपये आहेत. असा कमी दरात खरेदी केला कांदा दोन दिवसांत किरकोळ बाजारात आल्यानंतर किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांसाठी ३.१५ लाख कोटींची तरतूद

Aadhaar Authentication Farmers : आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची धावपळ

Soybean Bogus Seeds : गतवर्षी तक्रारी, यंदाही त्याच कंपन्यांचे बियाणे

Nachni Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाचणी लागवडीला प्रारंभ

Inter Cultivation Maharashtra : डवरणीला बैलजोडीचाच आधार

SCROLL FOR NEXT