Well Agrowon
ॲग्रो विशेष

Well Scheme : वंचितांना एक हजार ९३ विहिरी

Agriculture Scheme : नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरडवाहू जमिनीतील पिकांना पाणी मिळावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी विविध पिके घेऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एक हजार ९३ विहिरी खोदण्यास मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरडवाहू जमिनीतील पिकांना पाणी मिळावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी विविध पिके घेऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एक हजार ९३ विहिरी खोदण्यास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये एका शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, विहिरी खोदण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरडवाहू जमीन असलेल्या आणि वंचित घटकातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, यासाठी शासनाकडून विहीर खोदण्यासाठी मंजुरी दिली जाते.

वंचित घटकातील या योजनेसाठी दीड लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न व एक एकर जमीन बंधनकारक आहे. जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत दोन हजार ५६० शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले होते.

त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील ७९८ आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत क्षेत्राबाहेरील व क्षेत्रातंर्गत असे २९५ अशा एकूण एक हजार ९३ विहिरींना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मंजुरी दिली आहे. या संबंधीचे काम ग्रामिण भागात काही ठिकाणी सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी करून एक हजार ९३ विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी विहिरी खोदण्यास सुरुवात केली आहे.
विजय बेत्तीवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT