Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : पुणे विभागात रब्बी पेरणीपासून एक लाख २६ हेक्टर क्षेत्र दूर

Rabi Season : यंदा कमी झालेल्या पावसामुळे आणि जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे आणि जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. पुणे विभागात रब्बीच्या पेरणीपासून सुमारे एक लाख २६ हजार ४५६ हेक्टर क्षेत्र दूर राहिले आहे. त्यामुळे रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा यासह सर्वच मुख्य पिकांच्या उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रब्बी हंगामात उशिराने पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार २६६ पैकी १० लाख २२ हजार ८१० हेक्टरवर म्हणजेच ८९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अजूनही विभागात जवळपास ११ टक्के पेरण्या होणे बाकी आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात सरासरी १४ लाख ४९ हजार ७ पैकी नऊ लाख ८४ हजार ३८६ हेक्टरवर म्हणजेच ८८ टक्के पेरण्या झाल्या होत्या.

रब्बीच्या पेरणीपासून सुमारे १ लाख ६४ हजार ८८० हेक्टर क्षेत्र दूर राहिले होते. सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत असून ज्वारीच्या पिकाच्या काढणीस सुरुवात होणार आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे दाणे परिपक्व झाले असून काही भागांत जिरायत ज्वारी पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. गहू पीक वाढीच्या अवस्थेत असून पीक ओंब्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. मका पीक कणसातील दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे.

हरभरा पीक घाटे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. करडई व सूर्यफूल पिके बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहेत. तीळ पीक वाढीच्या व फुलोरा अवस्थेत आहे.

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पीक कणसामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक पोटरी अवस्थेत आहे. मका पीक दाणे पक्वतेच्या अवस्थेत हरभरा पीक घाटे भरण्याच्या व काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये खरीप हंगामातील तूर पिकाची काढणी चालू आहे. पावसाच्या खंडामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी पीक हुरडा ते पक्वतेच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. मका पीक पक्वतेच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. सद्यःस्थितीत गहू पीक पक्वतेच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. हरभरा पीक पक्वतेच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे.

जिल्हानिहाय रब्बीची झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- झालेली पेरणी -- पेरणीपासून दूर असलेले क्षेत्र
नगर --- ४,५८,६३६ -- ४,४९,१६२ -- ९४७४
पुणे -- २,२९,७२२ --- १,६९, ४८९ -- ६०,२३३
सोलापूर -- ४,६०,९१८ -- ४,०४,१४९ -- ५६,७४९
एकूण -- ११,४९,२६६ --- १०,२२,८१० --- १,२६,४६६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Farmer Producer Company : नवअनंत शेतकरी कंपनीची वाटचाल आशादायी

Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

SCROLL FOR NEXT