Sugarcane Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Fire : शिरूर येथे एक एकर ऊस जळून खाक

Latest Agriculture News : कुरुळी वडगाव शिव रस्त्यालगत सूरज यादव यांचा दीड एकर ऊस आहे. दुपारी साडेचार वाजता शॉर्टसर्किटमुळे अचानक ही आग लागली.

Team Agrowon

Pune News : येथील सूरज नामदेव यादव यांचा गट क्रमांक २१८ मधील एक एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. हा प्रकार रविवारी (ता. १२) दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. यात शेतकऱ्याचे तब्बल २ लाख रुपयांचे नुकसान झाले.

कुरुळी वडगाव शिव रस्त्यालगत सूरज यादव यांचा दीड एकर ऊस आहे. दुपारी साडेचार वाजता शॉर्टसर्किटमुळे अचानक ही आग लागली. धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील नागरिकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली.

आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. यात शेतकरी सूरज यादव यांचा एक एकर ऊस जळून खाक झाला. आता उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.

यादव यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात विद्युत वाहक तारांचे जाळे आहे. या वीजवाहक तारा जीर्ण झाल्या असून त्या वारंवार तुटतात. विद्युत वाहक तारांना अनेक ठिकाणी जोड देण्यात आले आहेत.

दरम्यान या अगोदर शॉर्टसर्किटमुळे चार वेळा यादव यांचा ऊस पेटला आहे. महावितरणकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने उसाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी सूरज यादव यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT