Flower Market Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Market:गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील फुलबाजार फुलला

गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) गेल्या दोन दिवसांपासून फुलांची (flowers) आवक आणि मागणी वाढली आहे. गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांनी फुले खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणेः फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हंगाम असलेला गणेशोत्सव (Ganeshotsav) आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फुलबाजारात विविध फुलांच्या आवकेत आणि मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या दरात देखील वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्राहकांमध्ये देखील फुले खरेदीचा उत्साह आहे.

गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) गेल्या दोन दिवसांपासून फुलांची (flowers) आवक आणि मागणी वाढली आहे. गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांनी फुले खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. पुणे बाजार समितीच्या फुलबाजारासह पुणे शहरातील महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर आणि उपनगरांमधील किरकोळ खरेदीदारांकडून फुलांना मोठी मागणी वाढली होती.

तर उपनगरांमध्ये देखील ग्राहकांनी फुलांसाठी गर्दी केली होती. विविध फुलांमध्ये पूजेसाठी लागणाऱ्या झेंडू, शेवंती, ॲस्टर, कागडा आदी फुलांना, तर शोभिवंत फुलांमध्ये गुलाब, कार्नेशन, ग्लॅडिओलससह विविध पत्रींना मागणी वाढली आहे.

‘‘पुणे बाजार समितीमध्ये पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमधून झेंडूच्या फुलांची मोठी आवक होत असते. गेल्या दोन दिवसांपासून हार विक्रेते आणि घाऊक खरेदीदारांची गर्दी होते. मात्र मंगळवारी (ता. ३०) ग्राहकांची गर्दी वाढलेली दिसून आली,’’ असे फूल अडते असोसिएशनचे पदाधिकारी सागर भोसले यांनी सांगितले.

विविध फुलांचे मंगळवारचे (ता. ३०) प्रतिकिलो दर

झेंडू - १५ -६०, शेवंती - ७०-१००, ॲस्टर १३०-२००, गुलछडी -१५०-३००, डच गुलाब (२० फुले) -१००-१५०, जरबेरा ४०-६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry Problems Solution: साखर उद्योगांसमोरील समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती

Grape Pruning: द्राक्ष पट्ट्यात ‘खरड’ छाटणी वेगात

Agri Shop License Suspension: पंधरा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Sanjay Gaikwad Controversy: आमदार संजय गायकवाड यांचे विधान विकृत : सपकाळ

Summer Bajra Harvesting: उन्हाळी बाजरी पीक काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT