Katraj Dairy Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून गाय दूध विक्री दरात कपात संघाकडून अधिकृत घोषणा

Katraj Dairy : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरीने) उद्यापासून (ता.०१) गाय दूध विक्री दरात कपात केली आहे.

sandeep Shirguppe

Pune Cow Milk Rate : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरीने) उद्यापासून (ता.०१) गाय दूध विक्री दरात कपात केली आहे. ही कपात प्रतिलिटर मागे दोन रुपये असल्याची माहिती देण्यात आली. सध्या ५५ रुपये असलेला दर ५३ रुपयांवर करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून दूध दरावरून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. अशातच ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय कात्रज डेअरीने घेतला आहे. कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक २४ नोव्हेंबर रोजी संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

तसेच कमी स्निग्ध व जास्त प्रोटीन असलेले गायीचे दूध २५० मिलिच्या पॅकिंगमध्ये ग्राहकांना १२ रुपये दराने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कात्रज दूध हे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून संघाकडून नेहमीच स्वच्छ, ताजे व भेसळविरहित दूधाचा पुरवठा केला जातो अशी माहिती देण्यात आली.

संघाचे रोजचे दूध संकलन सध्या दोन लाख लिटरवर पोहोचले आहे. नेहमीच्या तुलनेत संघाकडे सुमारे ७५ ते ८० हजार लिटरइतके अतिरिक्त दूध होत आहे. दुधाचे खरेदी दर उतरल्यामुळे विक्री दरात दोन रुपयांनी कपात करुन ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे कात्रजचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदीस ग्राहकांनी पसंती दयावी असे आवाहन कात्रज दूध संघ पुणे अध्यक्ष भगवान पासलकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT