Beekeeping Agrowon
ॲग्रो विशेष

Beekeeping Training : हिमाचल मधील अधिकाऱ्यांनी घेतले मधमाशीपालनाचे प्रशिक्षण

प्रशिक्षणार्थींना एक दिवस महाबळेश्वर येथे मधुसागर मधोत्पादक संस्था व एपीकल्चर संस्था येथे मधमाशीपालनाचे कार्य दाखविण्यासाठी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Pune News : पुणे केंद्रीय मधुमक्षिका संशोधन (Pune Central Bee Research) व प्रशिक्षण संस्थेत १३ ते १७ मार्च या कालावधीत हिमाचल प्रदेश राज्यातील अधिकाऱ्यांना मधुप्रशोषन, मधुपरीक्षण विशेष प्रशिक्षण देण्यात आले. ह्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एकूण २० अधिकारी प्रतिक्षणार्थीनी प्रशिक्षण पूर्ण केले.

हिमाचल प्रदेशातील सिमला येथील फलोत्पादन संचालनालयामार्फत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये, मधुपरीक्षण, मधुप्रशोधन विषयावर श्रुती कुंभार, मल्लमा, संस्थेच्या सेवानिवृत्त उपसंचालिका डॉ. डेजी थॉमस यांनी मधमाशीपालन व्यवस्थापन, शुभा मुजुमदार यांनी मधमाशांना होणारे रोग व त्यावर नियंत्रण, डॉ. के. लक्ष्मी राव यांनी मधुवनस्पती व रॉयल जेली संग्रहण यावर मार्गदर्शन केले.

तसेच रुचित फूड प्रॉडक्टच्या संचालिका सृष्टी विवेक खालोकर यांनी मधुउत्पादने व मद्याचे विविध पदार्थ, मधुचॉकलेट मधुबिस्कीट, मधाचे साबण बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

प्रशिक्षणार्थींना एक दिवस महाबळेश्वर येथे मधुसागर मधोत्पादक संस्था व एपीकल्चर संस्था येथे मधमाशीपालनाचे कार्य दाखविण्यासाठी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी संस्थेचे उपसंचालक प्राचार्य श्री. बसवराज यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणापत्रे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन सहसंचालक सुनील पोकरे यांनी केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

limate Change Hits Marine Fisheries : हवामान बदलामुळे मासेमारीचे दिवस घटले; सीएमएफआरआयच्या संचालकांनी दिली माहिती

Water Planning: पंचक्रोशीनिहाय जलनियोजनाची गरज

Vegetable Processing: फ्रेश-कट उद्योगासाठी कच्च्या मालाचे प्रक्रिया तंत्र

Universities Adopt Villages: महाविद्यालयांनी गावे दत्तक घ्यावी : राज्यपाल वर्मा

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज माफ, ‘हेअर कट’ धोरणाचाही शेतकऱ्यांना लाभ

SCROLL FOR NEXT