Lasalgaon Market Committee Election Agrowon
ॲग्रो विशेष

Lasalgaon APMC Election Approval: लासलगाव बाजार समितीत पदाधिकारी निवड होणार

High Court Verdict: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, ही निवडणूक प्रलंबित याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे.

Team Agrowon

Nashik News: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अखेर परवानगी दिली आहे. मात्र ही निवडणूक प्रलंबित याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे.

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठाने २४ मार्च २०२५ ला ‘ज्ञानेश्‍वर भागीनाथ गांगुर्डे आणि अन्य विरुद्ध राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (पुणे) आणि अन्य’ या प्रकरणावर सुनावणी घेतली.

यापूर्वी ४ मार्च २०२४ ला दिलेल्या आदेशात सुधारणा करून न्यायालयाने संबंधित बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुकीला हिरवा झेंडा दाखवला. मात्र ही निवडणूक पुढील आदेशाच्या अधीन असेल आणि अंतिम निर्णयानंतरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पुढील सुनावणी ७ एप्रिल २०२५ रोजी मूळ याचिकेवर होईल. राज्य निवडणूक प्राधिकरणाला म्हणणे मांडण्यास वेळ मागवला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

न्यायालयाने हा विषय हाय ऑनबोर्ड म्हणून नोंदवला असून, पुढील दोन आठवड्यांत यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. संबंधित सर्व पक्षकारांना उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी लागेल. या आदेशामुळे लासलगाव बाजार समितीच्या कामकाजाला तात्पुरता मार्ग मिळाला असला, तरी अंतिम निर्णयावरच समितीच्या नेतृत्वाचे भवितव्य ठरणार आहे.
ज्ञानेश्‍वर गांगुर्डे, याचिकाकर्ते, लासलगाव
बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींचा राजीनामा झाल्यामुळे कामकाज विस्कळित झाल्याने आम्ही उच्च न्यायालयाकडे सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया घेणे कामे अंतरिम अर्ज सादर केला होता. तो न्यायालयाने मान्य केला आहे आता निवडणुकीचा अडसर दूर झाला आहे.
बाळासाहेब दराडे, याचिकाकर्ते
बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींचा राजीनामा झाल्यामुळे कामकाज विस्कळीत झाल्याने निवडणूक प्रक्रिया घेणे कामे अंतरिम अर्ज सादर केला होता. तो न्यायालयाने मान्य केला आहे आता निवडणुकीचा अडसर दूर झाला आहे.
डी. के. जगताप, सदस्य, बाजार समिती, लासलगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT