Onion Management Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Management : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

Onion Production : कांदा हे फायदेशीर पीक आहे. या पिकाचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीपासून अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन घटक हे महत्त्वाचे ठरतात, असा सल्ला अकोला कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषय विशेषज्ज्ञ गजानन तुपकर यांनी दिला.

Team Agrowon

Akola News : कांदा हे फायदेशीर पीक आहे. या पिकाचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीपासून अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन घटक हे महत्त्वाचे ठरतात, असा सल्ला अकोला कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषय विशेषज्ज्ञ गजानन तुपकर यांनी दिला.

जिल्ह्यामध्ये कांदा पिकाखाली भरपूर क्षेत्र राहते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कांदा पिकाची लागवड रब्बी आणि उन्हाळी हंगामांमध्ये होत असते. हे लक्षात घेत अकोला कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने चेलका (ता. बार्शीटाकळी) येथे मंगळवारी (ता. १२) दर्जेदार कांदा उत्पादनासाठी अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या वेळी तुपकर बोलत होते.

श्री. तुपकर यांनी दर्जेदार कांदा उत्पादन घेताना सुधारित वाणांचा वापर भीमा शक्ती, पुणे फुरसुंगी, अर्का भीम, एन-२४१, सुदृढ आणि सशक्त रोपे निर्मिती तंत्र, रोपांना कार्बोसल्फान आणि कार्बेन्डाझीमची लागवड करताना प्रक्रिया,

लागवड करताना रुंद वरंब्याचा वापर, अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना नत्रयुक्त खतांचा शिफारशीत आणि तंतोतंत वापर, मिश्र खत जर शेतकरी वापरत असतील तर कांदा साठवणुकीमध्ये अधिक काळ टिकावा यासाठी गंधकयुक्त खतांचा वापर याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच सिंचनासाठी मायक्रोस्प्रिंकलर किंवा स्प्रिंकलर पद्धतीचा वापर करावा, असे आवर्जून सांगितले. शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीतील पाण्याची ओल तपासूनच नियोजन करावे.

अन्यथा अधिक पाण्यामुळे कांदा लवकर सडतो, असेही त्यांनी सांगितले. या वेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांची त्यांनी उत्तरे दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT