Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Sale : आता ६०० सोसायट्यांत बियाणे, खतांची विक्री

Cooperative Department : ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायट्यांमधून बी-बियाणे आणि खतांची विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायट्यांमधून बी-बियाणे आणि खतांची विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे ६०० सोसायट्यांमधून बी-बियाण्यांची विक्री सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्यात सुमारे २० हजार विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना गावातच चांगली व दर्जेदार बी-बियाणे मिळतील. विविध कार्यकारी सोसायट्यासुद्धा स्वावलंबी होण्यास मदत होईल.

विविध कार्यकारी सोसायट्या आर्थिकदृष्ट्या बळकट होणे व त्या माध्यमातून पतपुरवठा, विविध सेवा व वस्तूंचा पुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना व्हावा, या दृष्टिकोनातून या संस्थांचे संगणकीकरण होत आहे.

या संस्थांच्या पोटनियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसेच या संस्थांना १५२ प्रकारच्या वस्तू व सेवांचा व्यवसाय करता येईल, अशीही तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सोसायट्यांमध्ये बी-बियाणे विक्री करण्यास सुरुवात झाली आहे.

विविध प्रकारच्या ई-सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून या संस्थांमार्फत ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत ४ हजार ५०० सोसायट्यांनी ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ अंतर्गत नोंदणी केली आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- विविध कार्यकारी सोसायट्यांच्या पोटनियमांत काही बदल

- १५२ प्रकारच्या वस्तू व सेवांचा व्यवसाय करता येणार

- ‘ई-सेवा’साठी ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ होणार सुरू

- आतापर्यंत ४ हजार ५०० सोसायट्यांची ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ अंतर्गत नोंदणी

सोसायट्यांमधून बी-बियाणे विक्री करण्यास परवानगी देताना त्या सोसायट्यांमध्ये कृषी पदवीधर अथवा कृषी पदविकाधारक नेमणे आवश्यक आहे. यासाठीची परवानगी कृषी विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने दिली जात आहे.
- अनिल कवडे, सहकार आयुक्त, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT