onion Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : बाजार समितीत आता रोज लिलाव, प्रशासन अखेर नमले

Solapur APMC News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक दिवसाआड कांदा लिलाव करण्याचे धोरण प्रशासनाने सुरू केले.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक दिवसाआड कांदा लिलाव करण्याचे धोरण प्रशासनाने सुरू केले. पण यामुळे कांद्याची आवक फुगली जात असून याचा विपरीत परिणाम दारावर होत आहे.

या निर्णया मागे उद्भवलेली परिस्थिती की राजकीय कट? असा संशय व्यक्त केला जात होता, पण चोहोबाजूंनी बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या धोरणावर प्रहार होत असल्याने बाजार समिती नमली असून, आता रोज ६०० गाड्यांनाच बाजार समितीत प्रवेश देऊन लिलाव करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यापासून देशभरात कांद्याचे दर ढासळले आहेत. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या परिस्थितीचा फायदा काही राजकीय घटक घेत असल्याचा आरोप केला जात आहे. सहा डिसेंबरच्या सुट्टीनंतर सोलापूर बाजार समितीमध्ये एक दिवसाआड कांद्याचे लिलाव होत आहेत.

पहिल्या दिवशी हमाल उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र हे कारण तकलादू असल्याचे समोर आले. यानंतर केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात खरेदीदारांनी संप केल्याचे कारण पुढे करण्यात आले. यामुळे गेल्या आठवड्यात शनिवारी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले.

परिणामी सोमवारी बाजारात विक्रमी आवक झाली व कांद्याच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली. येणाऱ्या कांद्याचे दररोज लिलाव करा, यासाठी बाजार समितीतील एक पदाधिकारी आग्रही होते. मात्र त्यांचा आग्रह मोडून दोन दिवसाला कांद्याचे लिलाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे परिणाम सर्वांच्या समोर आहेत.

रोज ६०० ट्रक कांद्याचाच होणार लिलाव

कांद्याचे लिलाव एक दिवसाआड होत असल्याने सरासरी दर कमी होत आहेत. त्यामुळे बाजार समितीने आता कांद्याचे लिलाव दररोज करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

परंतु त्यासाठी दररोज ६०० गाड्यांनाच आत प्रवेश देऊन त्यांचे लिलाव केले जाणार आहेत. अतिरिक्त गाड्यांना टोकन देण्यात येणार आहे. त्याशिवाय यापुढे आता रविवारी सुट्टीदिवशीही लिलाव करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

सभापती अवतरले, संचालक मात्र गायब

सोलापूर बाजार समितीमध्ये जवळपास अठरा संचालक आहेत. गेली आठ दिवस झाले कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना. मात्र अपवाद वगळता एकही संचालक बाजार समितीच्या प्रवेशद्वाराच्या पलीकडे गेला नाही आणि शेतकऱ्याला धीर दिला नाही. जर मासिक बैठकीला विशेष ’’भत्ता‘ घेणाऱ्या या संचालकांच्या भूमिकेचा शेतकऱ्यांकडून निषेध होत आहे. शनिवारी अधिवेशनाचे काम संपल्यामुळे सभापती विजयकुमार देशमुख हे बाजार समितीच्या कार्यालयात दाखल झाले व त्यांनी कांदा प्रश्नाबाबत बैठक घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT