Amit Shah Agrowon
ॲग्रो विशेष

Amit Shah : आता प्राथमिक कृषी पतसंस्थेला फवारणीसाठी 'ड्रोन उद्योजक' होण्याची संधी

Agriculture Credit Institutions : देशातील प्राथमिक कृषी पत संस्थांच्या कर्मचाऱ्यांना खत आणि कीटकनाशकांच्या ड्रोन उद्योजक म्हणून परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी घेतला आहे.

Team Agrowon

Minister Mansukh Mandaviya : देशातील प्राथमिक कृषी पत संस्थांच्या कर्मचाऱ्यांना खत आणि कीटकनाशकांच्या ड्रोन उद्योजक म्हणून परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी घेतला आहे. केंद्रीय रासायनिक आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ८ जून रोजी हा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले.

रासायनिक खते आणि कीटकनाशक फवारणीसाठी प्रशिक्षणाची गरज असते. त्याशिवाय ड्रोनद्वारे खते आणि फवारणी करण्याची परवानगी दिली जात नाही. शेती क्षेत्रात ड्रोनच्या वापरामुळे वेळेची बचत होते. परंतु प्रशिक्षणाच्या अभावी ड्रोनच्या वापराला चालना मिळत नाही.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी गेल्या गुरुवारी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी आणि शेतीचं मॅपिंग करण्यासाठी प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला. ज्या प्राथमिक कृषी पत संस्था कार्यरत नाहीत, अशा संस्थांचा शोध घेऊन त्यांना ड्रोनसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच त्यांना प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राला जोडलं जाणार आहे, अशीही माहिती सहकार मंत्रालय दिली आहे.

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या मते, "या महत्त्वाच्या निर्णयामुळे प्राथमिक कृषी पतसंस्ठेला आर्थिक फायदा होईल. तसेच ग्रामीण भागात या संस्थेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच सेंद्रिय खते, कीटकनाशके, बियाणे आणि शेती अवजारे गाव पातळीवर उपलब्ध होतील."

देशात सेंद्रिय खतांच्या आणि कीटकनाशकांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचं केंद्र सरकारचा मानस आहे. त्यामुळे देशातील सेंद्रिय खतांचं आणि कीटकनाशकांचं मार्केटिंग करणाऱ्या संस्थांशी प्राथमिक कृषी पतसंस्थांना जोडले जाणार आहे.

तसेच मार्केट डेव्हलपमेंट असिस्टंन्सच्या माध्यमातून सेंद्रिय खते आणि कीटकनाशके शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे देशातंर्गत सेंद्रिय खतांची साखळी निर्माण होईल, असा विश्वास प्रसिध्दी पत्रकात व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान, देशभरात १ लाख प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT