Land Survey Agrowon
ॲग्रो विशेष

e-Mojani Land Survey : जमीन मोजणी प्रक्रिया झाली डिजिटल ; मोजणीची ‘क’ प्रत घरबसल्या मिळणार

Digital Land Measurement : जमीन मोजणीसाठी अर्ज करणे, मोजणी फी भरणे, मोजणीची नोटीस पाठविणे, त्यानंतर मोजणी झाल्यानंतर त्याची ‘क’ प्रत घेण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : जमीन मोजणीसाठी अर्ज करणे, मोजणी फी भरणे, मोजणीची नोटीस पाठविणे, त्यानंतर मोजणी झाल्यानंतर त्याची ‘क’ प्रत घेण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. त्यासाठी भूमिअभिलेख विभागाने ई-मोजणी २.० ही नवीन प्रणाली आणली आहे. या प्रणालीनुसारच पुणे जिल्ह्यात मोजणीची कामे करण्यात येत आहेत.

त्यामुळे मोजणी झाल्यानंतर ‘क’ प्रत मिळण्यासाठी नागरिकांना मोजणी कार्यालयात जावे लागणार नाही. ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरी असलेली क प्रत नागरिकांना घरबसल्या डाउनलोड करता येणार आहे. जमिनीची हद्दकायम, पोटहिस्सा, बिनशेती, विविध प्रकल्पांसाठी भूमिसंपादन आदींसाठी मोजणीचे काम केले जात आहे.

ई-मोजणी २.० या प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर राजगड तालुक्यात करण्यास सुरुवात झाली आहे. आता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. ई-मोजणी २.० या संगणक प्रणालीमध्ये दाखल होणाऱ्या मोजणी अर्जातील जमिनींची मोजणी जीआयएस आधारित रोव्हर्सद्वारे करण्यात येत आहेत.

त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक जमिनींच्या हद्दीचे अक्षांश व रेखांश प्राप्त होणार आहेत. परिणामी, जमीन मोजणी प्रकरणांमध्ये मानवी चुकांमुळे हद्दीत होणाऱ्या चुका अथवा दोन मोजणीमुळे हद्दीमध्ये अंतर पडणे, यासारखे बाद कमी होण्यास मदत होणार आहे.

मोजणी झाल्यानंतर अर्जदारांना मोजणी नकाशाच्या क प्रति प्रत्यक्ष पुरविल्या जातात. या मोजणी नकाशाच्या ‘क’ प्रतीमध्ये जागेवर प्रत्यक्ष मोजणी वेळी वहिवाट अथवा ताब्याप्रमाणे अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या हद्दी दर्शवून योग्य परिमाणात संबंधित टिपा नमूद मोजणी नकाशाची ‘क’ प्रत पुरविली जाते. या प्रणालीनुसार जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोजणीचा नकाशा अर्थात ‘क’ प्रत ही ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीसह अर्जदाराला मिळणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाच्या सूत्रांनी दिली.

ई-मोजणी २.० दृष्टिक्षेपात...

- ‘क’ प्रतीवर अक्षांश, रेखांशाचा उल्लेख.

- अक्षांश, रेखांशने ‘क’ प्रतची सत्यता पडताळता येणार.

- ‘क’ प्रत कोणालाही पाहता येणार.

- नकाशा पब्लिक पोर्टलवर उपलब्ध असणार.

- जमिनीचे लोकेशनदेखील कळणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT