Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition Compensation : चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन नाही

Raju Shetti : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही.

Team Agrowon

Kolhapur News : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत रत्नागिरी-नागपूर महामार्गाबाबात शेतकऱ्यांनी तातडीने हरकती घेण्याच्या सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिल्या.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही. प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अनागोंदी कारभार सुरू असून, याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी मगच मोजणीबाबत कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केली.

विकासकामांना शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करता येणार नाही. शेतकऱ्यांनी चौपट मोबदल्यासाठी हेलपाटे मारूनही याबाबत शासनाकडून कोणतीच कारवाई केली नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयाने चौपट मोबदल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र, राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीस मान्यता न दिल्याने शासन स्तरावर हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.

गेल्या आठवड्यात केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता केंद्र सरकार वाढीव मोबदला देण्यास सकारात्मक असून, याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सांगितले. निमशिरगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

आधी अडचणी सोडवा, नंतर मोजणी करा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्ग करत असताना स्थानिक शेतकऱ्यांना पाइपलाइन स्थलांतर करणे, गटाच्या हद्दी निश्‍चित करणे, लहान ओढे व नाले यांचा मार्ग निश्चित करणे, शेतीचे तुकडे झाल्याने शेतकऱ्यांना तेथे जाण्यास वाहतुकीची व्यवस्था करणे.

महामार्गास भराव होत असल्याने सर्व्हिस रोडची सोय करणे, यासह विविध अडचणींची सोडवणूक केल्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास या ठिकाणी मोजणी करू देणार नसल्याचा निर्णय घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT