Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान

Crop Loss : चिखली तालुक्यातील मालगणी-सावरगाव-वाघापूर- अंत्रीकोळी-गोदरी-चांदई या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू असून, या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे.

Team Agrowon

Buldana News : चिखली तालुक्यातील मालगणी-सावरगाव-वाघापूर- अंत्रीकोळी-गोदरी-चांदई या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू असून, या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्यालगत नाल्या न काढल्यामुळे अंत्रीकोळी शिवारातील शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे पाण्यात गेले आहे.

शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्यानंतरही पुन्हा नुकसान झाल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष देत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक, तसेच नितीन राजपूत यांनी तहसीलदारांकडे केली आहे. तसेच त्यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणीही केली.रस्ता तयार करताना त्याच्या आजूबाजूला नाल्या असणे गरजेचे असते.

ते अपेक्षितही राहते. परंतु या रस्त्याचे काम करताना नाल्या नसल्याने आता पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये साचते आहे. या प्रकरणात कंत्राटदाराचा निष्काळजीपणा समोर आला आहे. वास्तविक नाल्या नसतील तर पाण्याचा निचरा होणार नाही, असे शेतकऱ्यांनी यापूर्वीच निदर्शनास आणून दिले होते.

तरीही रस्त्यालगत नाल्या करण्यात आलेल्या नाहीत. यावर कंत्राटदाराकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अंत्रीकोळी शिवारात गट नंबर २३, २४, व २५ मधील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

आंदोलनाचा इशारा

या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला काळ्यात यादीत टाकावे, संपूर्ण रस्त्याचे स्थळ पंचनामे करून निकृष्ट दर्जाच्या कामाचा अहवाल तयार करावा, शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या उत्पन्नावरून नुकसानभरपाई द्यावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसान भरपाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरावे, असे निवेदनात म्हटले आहे. नुकसानभरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT