Tanaji Sawant Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : एकही पीक बाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहू नये

Crop Loss : मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Dharashiv News : मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे बाधित एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी (ता. चार) जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसीनाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत उपस्थित होते.

दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार बैठकीत सहभागी होते. प्रा. सावंत म्हणाले की, सन २०२३ मध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत पीक विमा कंपनीने अनेक चुकीची कामे केली आहेत.

कंपनीकडून देण्यात येणारे रकमेचे धनादेश हे चुकीच्या पद्धतीने आणि कमी रकमेचे दिले होते. यंदा पीक विमा वाटप करताना शेतकऱ्यांना समान व व्यवस्थित वितरण होईल, या दृष्टीने काम करावे.

विमा कंपनीकडून देण्यात येणारी रकमेचे धनादेश याची पडताळणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी केवायसी तत्काळ करून घ्यावी. रब्बी हंगामात लागणारे खते बियाणे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत. बोगस खत विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना प्रा. सावंत यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT