Summer Heat Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Heat Alert : निफाड कृषी केंद्रावर उच्चांकी तापमान नोंद

Heat Wave : मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाची दाहकता वाढत गेली आहे. परिणामी त्याचा जनजीवनावर परिणाम झाला असून सूर्य आग ओकत असल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Nashik News : मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाची दाहकता वाढत गेली आहे. परिणामी त्याचा जनजीवनावर परिणाम झाला असून सूर्य आग ओकत असल्याची स्थिती आहे. मागील सप्ताहात ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात घसरण झाली होती. मात्र पुन्हा पारा वाढला असून गुरुवारी (ता.१०) निफाड कृषी संशोधन केंद्रावर ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये तुलनेने कमाल तापमान अधिक नोंदविले आहे.

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात तापमान वाढत जाऊन ते ४१ अंशांवर गेले आहे. उन्हाचा चटका वाढल्याने यंदा पिके लवकर पाण्यावर येत आहेत. द्राक्ष हंगामात मालाची पक्वता लवकर आली. तर रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा काढणी सुरू झाली असून या चटक्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. उन्हाचा मानवी जीवनासह पिके व जनावरांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे.

निफाड कृषी संशोधन केंद्रावर सर्वाधिक तापमानाची नोंद यापूर्वी १६ मे २०२३ रोजी ४२.४ अंश सेल्सिअस इतकी झाली होती. मागील वर्षी एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात सरासरी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होते. तर यावर्षी सरासरी तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके राहिले आहे. मागील वर्षापेक्षा सरासरी तापमान १ अंश सेल्सिअसने अधिक राहिले आहे.

चालू वर्षीच्या उन्हाळ्यात कमाल तापमान ८ एप्रिल रोजी ४०.५ अंश इतके तर किमान तापमान ६ मार्च रोजी ४.२ अंश सेल्सिअस इतके राहिले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला १ एप्रिल रोजी किमान तापमान २० अंशावर होते. कमाल व किमान तापमानात चढउतार दिसून आली तर आता पुन्हा कमाल व किमान तापमान वाढत असल्याचे कृषी संशोधन केंद्रांवरील नोंदीवरून समोर आले आहे.

चालू एप्रिल महिन्यातील तापमान नोंदी

दिनांक कमाल किमान

१ एप्रिल २०२५ ३९ २०.३

२ एप्रिल २०२५ ३८.७ १८.३

३ एप्रिल २०२५ ३५.६ १५.८

४ एप्रिल २०२५ ३६.६ १७

५ एप्रिल २०२५ ३६.६ १५

६ एप्रिल २०२५ ३८.३ १४.६

७ एप्रिल २०२५ ३९.५ १६.८

८ एप्रिल २०२५ ४०.५ १६.६

९ एप्रिल २०२५ ४१.३ १८.८

१० एप्रिल २०२५ ४१.८ १८.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Reshim Abhiman 2.0: ‘मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ प्रभावीपणे राबवा

Tur Prices: तूर बाजार किमान आधारभूत किमतीच्या उंबरठ्यावर

Maharashtra Rain: कोयना, वारणा धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरूच

Kharif Sowing: लातूर विभागातील पेरण्या अंतिम टप्प्यात

Khandesh Irrigation Stock: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT