Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Drought : सोलापूर जिल्ह्यातील नऊ महसूल मंडले दुष्काळापासून लांबच

Drought Condition : सोलापूर जिल्ह्यात हवामान स्वयंचलित यंत्रे नसल्याचा फटका नऊ महसूल मंडलांना बसला आहे. त्या नऊ महसूल मंडलांचा दुष्काळाच्या नवीन यादीतदेखील समावेश होवू शकला नाही.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला, बार्शी या पाच तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यानंतर उर्वरित सहा तालुक्यातील ४६ महसूल मंडलांचाही दुष्काळात समावेश झाला. मात्र, हवामान स्वयंचलित यंत्रे नसल्याचा फटका नऊ महसूल मंडलांना बसला आहे. त्या नऊ महसूल मंडलांचा दुष्काळाच्या नवीन यादीतदेखील समावेश होवू शकला नाही.

तालुक्यातील एकूण पाऊस व हवामानाचा अंदाज घेण्यासाठी तेथील महसूल मंडलांमध्ये बसविलेल्या स्वयंचलित हवामान यंत्रांचा (पर्जन्यमापक) आधार घेतला जातो. सोलापूर जिल्ह्यात ९२ महसूल मंडले आहेत, पण नऊ मंडळांमध्ये ही यंत्रणाच नाही. त्यामुळे तालुक्यातील किंवा शेजारील महसूल मंडलातील पाऊस त्या मंडलांसाठी गृहीत धरला जातो.

यंदा जिल्ह्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ‘सकाळ’ने त्यावर सातत्याने पाठपुरावा केला आणि ‘झळा दुष्काळाच्या, पण निकषामुळे पंचाईत’ अशी वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे सहा तालुक्यातील ४६ महसूल मंडलांचाही दुष्काळाच्या यादीत समावेश झाला.

मात्र, नऊ महसूल मंडलांमध्येदेखील दुष्काळाची दाहकता तेवढीच असतानाही दुष्काळाच्या यादीत त्यांचा समावेश नाही. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येकी एक, पंढरपूर तालुक्यातील दोन तर उत्तर सोलापूर तालुक्यातील चार महसूल मंडलांचा त्यात समावेश आहे. तेथील शेतकऱ्यांसाठी आता जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टरी आर्थिक मदत दिली जाते. दुसरीकडे पीक कर्जाचे पुनर्गठन, वीज बिलात सूट, कृषी पंप वीज खंडित करण्याला स्थगिती, सक्तीची कर्जवसुली न करणे, शेतसाऱ्यात सूट अशा सवलती दिल्या जातात.

आर्थिक मदतीत जिरायतीसाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये, बागायती जमिनीसाठी १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक जमिनीसाठी २२ हजार ५०० रुपयांची भरपाई दिली जाते. अजून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT